चिरेखनी येथील ढोंगी बाबा चा अनिस ने केला पर्दाफास
पुलिस योद्धा न्यूज़ नेटवर्क ला माहिती मिळेनुसार तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील संजय साठवणे हा स्वतःच्या अंगात फरीद बाबा आल्याचे भासवून अंधश्रददा पसरवित असल्याची तक्रार आल्याने अनिस ने पोलिसांच्या मदतीने पर्दाफास केला.
सदर बाबा रोगमुक्त करण्यासाठी तंत्र मंत्र करून राख लिंबू देवून पैसे घेत होता. तसेच कोणी कोणाला भूतबाधा लावले आहे, करणी केली आहे, असे सांगत असे, तसेच कोणाला मूलबाळ होत नसतील त्याला मूल करून देण्यासाठी विधी सांगत हमी देत समाजात गावात अंधश्रद्धा पसरवत आहे. त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराकडे प्राप्त झाली. त्यानुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ता दशरथ शहारे, नितेश बोरकर यांना बाबाच्या दरबारात पाठविण्यात आले. त्यावेळी फरिद बाबाने दशरथ शहारे यांना सांगितले की तुझ्या घरी खूप जुनी देवता आहे. ती तुला सतावते. तिला बांधण्यासाठी तुला पुन्हा इथे यावे लागेल. ही राख खा, तू हमखास बरा होशील. असा दावा केला. नाही तर तुझ्या बरा वाईट होणार, अशी धमकी दिली. तंत्र मंत्र करून राख दिली, घराभोवती मोवऱ्या व मीठ टाकण्यास सांगितले व दिनांक 25.5.2023 ला दरबारात येण्यास सांगितले.
असा केला भांडाफोड….
त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी संघर्ष विभाग राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, प्रकाश नाकतोडे, चंद्रशेखर भिवगडे, पुरुषोत्तम गायधने यांनी तिरोडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. चिरेखनी येथील ढोंगी बाबाच्या दरबारात पोलिसासमक्ष भेट दिली, तेव्हा दरबारात खेड्यापाड्यातील वीस ते पंचवीस महिला व पुरुष उपस्थित होते. त्यावेळी दशरथ शहारे यांनी बाबाला सांगितले की माझा पोट दुखतो, छाती दुखतो, मळमळ वाटते, चक्कर येतो. तेव्हा बाबाने तंत्र मंत्र केला व दोन लिंबू दिले. बाबा जोराजोराने भीती वाटेल असा ओरडू लागला. मला घर बांधावे लागेल तेव्हाच तुझ्या घरची कुसराई देवता तुला सतावणार नाही, असे सांगितले.
त्याचवेळी विष्णुदास लोणारे यांनी बाबाला विचारले की बाबा माझे नाव काय आणि मी कोण आहे आणि कुठून आलो आहे. बाबांनी उत्तर न देताच माझ्या अंगात काहीच येत नाही, असे म्हटले. बाबाच्या अंगातला फरिद बाबा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा नाव घेताच गायब झाला. यानंतर लोकांना फसवणार नाही झगडे लढणार नाही असे सांगितले.
त्यावेळी पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, पोलीस हवालदार नितेश बावणे, चेतन भैसारे, निलेश ठाकरे, महिला पोलिस भूमेश्वरी वराडे यांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा उच्चाटन कायदा 2013 चे कलम 3, दोन नुसार ढोंगी बाबा संजय साठवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.
रुपसिंग पिलगर
पत्रकार
पोलिस योद्धा न्यूज़ नेटवर्क
भंडारा/गोंदिया जिल्हा