गौरक्षकच बनलाय भक्षक कसाईदार. कत्तल खान्याकडे जाणारे दोन महिंद्रा पिकप जेरबंद. मात्र तो गौरक्षक अद्याप मोकाटच

प्रतिनिधी लाखांदूर :-
साकोली दिघोरी महामार्गावर कत्तलखान्यात जाणारे गोवंशांना पायाला दोराने बांधून पिडादायक रित्या भरगच्च कोंबून महिंद्रा बोलेरो पिकअप व्दारे वाहतूक केल्याची घटना रविवार दिनांक ११फरवरी सकाळी ६:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. दिघोरी/मोठी पोलिसांनी २ बोलेरो पिकअप सह १० जनावरे किंमत ११ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून २ इसमांवर गुन्हा दाखल केला. त्यांची नावे उत्तम आनंदराव झींगरे (४३) रा. सावरबधं तालुका साकोली व मोहन रतीराम वय (४७)पातोळे रा. सुकळी, तालुका साकोली असे असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरदास धंदर यांचे सतीश पुराम, हितेश मडावी, पोलिस शिपाई घनश्याम कोडापे,आकाश सोनवाने यांचे पोलिस पथक दिघोरी ते लाखांदूर महामार्ग क्रमांक ३५३ वर गस्तीवर असतांना जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांवर नजर ठेऊन असतांना दिघोरी/मोठी कडून लाखांदूर कडे जाणारे महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच ४० बीजी २१७१ आणि एम एच ३६ एए ०७६६ भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आल्याने महिंद्रा बोलेरो पिकअप चालकास थांबवून झडती घेतली असता त्यात १० लाल व पांढऱ्या रंगाचे बैल किंमत प्रत्येकी अंदाजे १५ हजार असे एकूण १ लाख ५० हजार व दोन्ही महिंद्रा बोलेरो पिकअप ची किंमत ९ लाख रुपये असे एकूण ११ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चालकावर गुन्हा दाखल करून जणावरांची गौशाळेत रवानगी करून तर वरिष्ठांकडून शाबासकी मिळवून पोलिस कर्मचारी मोकळे झाले.
मात्र सदर तस्करीचे प्रकरण येथेच न थांबता वेगळे वळण घेताना दिसत आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार पिकप चालक मोहन रतिराम पातोळे हे खुद्द गौशाळा चालवित असून शासनाची दिशाभूल करत गौशाळेतीलच जणावरे कत्तलखान्यात पाटवीत असून हा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसांपासून सूरू असून संबंधीत विभागाच्या डोळ्यात धूळफेक करून बिनबोभाटपणे जणावरांना कसायाच्या दारी पाठवित असल्याची गुप्त माहिती समोर आली असून यामुळे सदरच्या गौतस्करीतील मुख्य सुत्रधार हे पातोळे असल्याचे नाकारता येऊ शकत नाही यामुळे संशयाची सुई सरळ पातोळे कडे फिरताना स्पष्ट दिसत असतांना थातूरमातूर कारवाई करून पोलिस प्रशासनाने गौतस्करीसाठी रान मोकळे केल्याचे परिसरात बोलले जात आहे.आता गौरक्षकच भक्षक बनत असतील तर कुणाच्या विश्वासावर गौमातेला गौशाळेत पाठवावे असा सवालही नागरिक विचारत आहेत.या सबंध प्रकरणाची दखल खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबांनीच घेतली पाहिजे आणि त्या तस्करीतील मुख्य सुत्रधार तो गौशाळेच्या मालकाचा परवाना रद्द करून कठोर शासन कारवाई करण्याची मागणी गौमाता प्रेमीकडून केली जात आहे.