BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ नागपुर

कांद्री ला युवकास चाकु सारख्या शस्त्रा ने मारून गंभीर जख्मी केले स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने मनसर येथुन दोन आरोपी पकडले.

Summary

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत जुन्या एम.एस. सी.बी कार्यालय जवळ कांन्द्री येथे फिर्यादी व आरोपी हे मित्र असुन यांचे शुल्क कारणावरून भांडण झाल्या ने आरोपी ने फिर्यादी आकाश भोंडेकर च्या छातीवर, कंबरेवर व हातावर चाकुने मारहाण करुन गंभीर जख्मी […]

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत जुन्या एम.एस. सी.बी कार्यालय जवळ कांन्द्री येथे फिर्यादी व आरोपी हे मित्र असुन यांचे शुल्क कारणावरून भांडण झाल्या ने आरोपी ने फिर्यादी आकाश भोंडेकर च्या छातीवर, कंबरेवर व हातावर चाकुने मारहाण करुन गंभीर जख्मी केल्याने फिर्यादी च्या बयाणा वरून कन्हान पोलीसांनी आरोपी इरफान खान विरुद्ध गुन्हा दाखल करून स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने मनसर येथुन दोन आरोपी पकडुन कन्हान पोस्टे ला
ताब्यात देऊन पुढील तपास कन्हान पोलीसांनी सुरू केला आहे.
हकीकत अशा प्रकारे आहे की आकाश धनिराम भोंडेकर वय २५ वर्ष राह. हरिहरनगर वार्ड नं.१ कांद्री कन्हान व इरफान उर्फ चोरवा मकबुल खान वय १९ वर्ष राह. हरिहर नगर वार्ड नं १ कांद्री हे मित्र असुन एकाच वस्तीत राहत असुन शनिवार (दि.३१) जुलै २०२१ ला सायंकाळी आकाश भोंडेकर आपल्या दुचा कीने घरी जात असताना इरफान उर्फ चोरवा मकबुल खान याने आपली सायकल आकाश भोंडेकर च्या दुचाकी समोर आणली त्यावरून आकाश भोंडेकर व इरफान खान या दोघां मध्ये तोंडा-तोंडी वाद झाला. त्या दरम्यान इरफान खान याने आकाश भोंडेकर ला दोन तीन झापड मारल्या व पाहुन घेण्याची धमकी दिली. त्यावर आकाश भोंडेकर याने इरफान खान या ला म्हटले कि, तुझ्या सारखे खुप पाहीले, तेरी औकात नही है असे म्हणून आकाश भोंडेकर घरी निघुन गेला. दुसऱ्या दिवशी रविवार (दि.१) ऑगस्ट२०२१ ला सका ळी ९ ते ९:३० वाजता दरम्यान आकाश भोंडेकर हा चौकात उभा असता इरफान खान हा तेथे आला व आकाश भोंडेकर यास म्हणाला कि तु काल माझी औकात का काढलीस असे बोलुन मनात राग धरून आकाश भोंडेकर याचा जिव घेण्याच्या उद्देशाने त्या च्या छातीवर, डाव्या कंबरेवर, उजव्या हाताच्या दंडा वर चाकु सारख्या शस्त्रीने मारून जख्मी केले. अश्या फिर्यादी आकाश धनिराम भोंडेकर यांच्या तोंडी रिपोर्ट वरून व वैद्यकीय अहवालावरून आरोपी इरफान उर्फ चोरवा मुकबुल खान यांच्या विरुद्ध अप क्र. २९८ /२०२१ कलम ३०७, ५०७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणचे पथकाचे सपोनि अनिल राऊत, साफौ लक्ष्मी प्रसाद दुबे, हेकॉ विनोद काळे, नापोशि शैलेश यादव, अरविंद भगत, पोशि प्रणय बनाफर, विरेंद्र नरड, चालक साहेबराव बिहाडे कन्हान पोस्टे चे पीएसआय जावेद शेख यांनी दोन्ही आरोपी इरफान व अमन कैथवार ला मनसर येथुन अटक करून कन्हान पोस्टे च्या ताब्यात दिले. सदर घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करत आहे.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *