शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी यांनी परिपत्रक काढून एजंट म्हटल्यामुळे शिक्षणाधिकारी(प्राथ ) यांचा निषेध
Summary
चंद्रपूर जिल्हा परिषद च्या प्राथमिक शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मोठया प्रमाणात प्रलंबित असून मागील वर्षात एक शिक्षक संघटनेने प्राथमिक शिक्षकांच्या समस्या विरोधात जिल्हा परिषद च्या समोर 23 दिवस आंदोलन केले होते. परंतु शिक्षणाधिकारी (प्राथ ) हे शिक्षकांच्या समस्या सोडण्याऐवजी […]
चंद्रपूर जिल्हा परिषद च्या प्राथमिक शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मोठया प्रमाणात प्रलंबित असून मागील वर्षात एक शिक्षक संघटनेने प्राथमिक शिक्षकांच्या समस्या विरोधात जिल्हा परिषद च्या समोर 23 दिवस आंदोलन केले होते. परंतु शिक्षणाधिकारी (प्राथ ) हे शिक्षकांच्या समस्या सोडण्याऐवजी प्रलंबित कसे राहतील त्यासाठी त्रुटी काढून परत पाठविण्याचा सपाटा सुरु केलेला आहे. जिल्हातील 415 प्राथमिक शिक्षक,120 पदवीधर शिक्षक व 100 उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांना बारा वर्ष पूर्ण होऊन 3 – 4 वर्ष पूर्ण होऊन वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात आली नाही. 20 वर्षांपासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी नाही, निवड श्रेणीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथ ) यांनी गटशिक्षणाधिकारी यांना 31 जानेवारी 2020 ला पत्र लिहून पात्र शिक्षकांची माहिती मागितले तरी गटशिक्षणअधिकारी यांनी एक वर्ष होऊननही प्रस्ताव सुद्ध्दा पाठविले नाही त्यामुळे शिक्षणाधिकारी (प्राथ ) यांनी 11 डिसेंबर ला पुन्हा गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून निवड श्रेणी चे प्रस्ताव मागितले आहे. यावरून गटशिक्षणाधिकारी हे शिक्षणाधिकारी (प्राथ ) यांच्या पत्राला जुमनात नसून त्यांचा प्रशासनावर पकड नाही हे सिद्ध होते. शिक्षक सेवानिवृत्त होऊनही शिक्षणाधिकारी (प्राथ ) यांच्या अकार्यक्षमतेमुळे व निस्क्रीयतेमुळे चार वर्षांपासून गटविमा, भ. नी. नी. चे अंतिम भुगातन झाले नाही. सहाव्या वेतन आयोगाचे हफ्ते भ. नी. नी. खात्यात जमा करण्यात आले. काही गटशिक्षणाधिकारी यांनी सहाव्या वेतन आयोगाची कोणत्याही शिक्षकांचे हफ्ते शिल्लक नाही म्हणून शासनाकडे अनुदान परत पाठविले . वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. शिक्षकांना शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी मंजुरी दिली जात नाही. भ. नी. नी.खात्यातून लग्न कार्यासाठी रक्कम काढण्यासाठी वधू वरांच्या आधार कार्डची शक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद च्या इतर विभागात मात्र लग्न पत्रिकाच्या आधारावर लग्न कार्यासाठी भ. नी. नी रक्कम मंजूर करण्यात येते. याबाबत प्रहार शिक्षक संघटनेने वारंवार जिल्हा परिषद कडे पत्र व्यवहार केला, परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने समस्या कडे दुर्लक्ष केले . त्यामुळे शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री ना. विजयभाऊ वड्डेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन पालकमंत्री यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी यांना प्राथमिक शिक्षकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी संघटनेबरोबर चर्चा करण्याचे निर्देश देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडविण्याऐवजी शिक्षणाधिकारी (प्राथ ) यांनी 22 डिसेंबर 2020 ला परिपत्रक काढून शिक्षकांच्या कोणत्याही समस्या प्रलंबित नाहीत व शिक्षक हे एजंट मार्फत समस्या घेऊन येतात अशा प्रकारचे परिपत्रक काढून जिल्हातील शिक्षक संघटनाचा अपमान केलेला आहे. शिक्षणाधिकारी (प्राथ ) यांच्या कार्यालयात यावरून भष्ट्राचार होत असून एजंट मार्फतीने कामे केली जातात हे सिद्ध होते. शिक्षणाधिकारी (प्राथ ) यांचा प्रहार शिक्षक संघटने मार्फत तीव्र शब्दात निषेध करीत आहे. प्रहार शिक्षक संघटना याबाबत शिक्षणाधिकारी(प्राथ ) यांना जाब विचारणार असून शिक्षणाधिकारी (प्राथ ) यांच्या हकालपट्टीची मागणी ना. बच्चू भाऊ कडू, शालेय शिक्षण राज्यमंत्री यांच्याकडे लावून धरणार आहे. शिक्षणाधिकारी (प्राथ ) हे जर भष्ट्राचाराचे समर्थक नाहीत तर नागभीड पंचायत समितीमधील झालेल्या समायोजन प्रक्रियामधील भष्ट्राचाराची चौकशी करून समायोजन रद्द का करीत नाहीत .ब्रम्हपुरी व नागभीड पंचायत समिती मधील सायन्स किट खरेदी च्या भष्ट्राचाराची चौकशी करून कारवाई का करीत नाहीत .चंद्रपूर प स अंतर्गत पदमापूर शाळेतील मुख्याध्यापक यांना मारहाण करणाऱ्या विषय शिक्षकाला अहवाल येऊन दोन महिन्यापासून का निलंबीत करीत नाहीत. संघटना वारंवार शिक्षकांच्या समस्या उपस्थित करीत असल्यामुळे परिपत्रक काढून स्वतःची पाठ थोपटण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रयत्न (प्राथ ) केलेले आहे.
संघटनेने निवेदन देऊन समस्या सोडवाव्या याच भूमिकेत संघटणा होत्या पण अशा परिपत्रकाद्वारे शिक्षक संघटनेच्या कार्यावरच बोटं ठेवून शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांला एजंट संबोधले आहे हे एकदा सिद्ध करून दाखवावे अन्यथा शिक्षक संघटना एकत्रित येऊन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विनोद लांडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
राजकुमार खोब्रागडे
मुख्य संपादक तथा डायरेक्टर
91589 63891/ 9022244767