वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाची गरज एक विद्यार्थी-एक रोप (वृक्ष)-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभियान

वार्ताहर – कोंढाळी-दुर्गाप्रसाद पांडे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चा तिसरा वर्धापन दिन साजरा करते वेळी सी बी एस ई स्कूल व हायस्कूल चे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण संतुलन या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण व संवर्धनाचा एक भाग म्हणून
लाखोटिया भुतडा सी बी एस ई हायस्कूल यांचे वतीने पर्यावरण जनजागृती, ऊर्जा संवर्धन, प्लास्टिक प्रदूषण टाळणे आदीची माहितीसाठी देण्यासाठी
वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोहीमें अंतर्गत लाखोटीया भुतडा सीबीएसई हायस्कूल चे वतीने एक विद्यार्थी – एक रोप (वृक्ष) अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. हे अभियान
29 जुलै 2023 ते 28 ऑगस्ट 2023
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार, एक विद्यार्थी-एक वनस्पती या मोहिमेअंतर्गत
पर्यावरण जागरूकता आणि त्याच्या संवर्धन आणि टिकाऊपणाबद्दल संवेदनशीलता तसेच झाडे लावा झाडे जगवा
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्राचार्य डॉ.ज्योती राऊत,प्रशासकीय अधिकारी अशोक काष्टी व सी बी एस ई हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पर्यावरण संतुलन संबंधी माहिती दिली.