▪ विद्रोही तुकाराम महाराज ▪ ० सत्य असत्याशी मन केले ग्वाही । ० मानियले नाही बहुमता ।।
Summary
० मानियले नाही बहुमता ।। ०तुकाराम महाराजांचा संघर्ष ज्या वैदिक ब्राह्मणी मनुवाद्या बरोबर होता, त्यांच्या हाती हजारो वर्षापासून धार्मिक-सामाजिक सत्ता एकवटलेली असल्यामुळे त्यांच्या वाटेला जाण्याची धमक बहुजनात नव्हती पण संत तुकाराम वैदिक ब्राह्मणी मनुवाद्यांच्या विरोधात गेले ० वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेच्या […]
० मानियले नाही बहुमता ।।
०तुकाराम महाराजांचा संघर्ष ज्या वैदिक ब्राह्मणी मनुवाद्या बरोबर होता, त्यांच्या हाती हजारो वर्षापासून धार्मिक-सामाजिक सत्ता एकवटलेली असल्यामुळे त्यांच्या वाटेला जाण्याची धमक बहुजनात नव्हती पण संत तुकाराम वैदिक ब्राह्मणी मनुवाद्यांच्या विरोधात गेले
० वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेच्या संघर्षातच संत तुकाराम महाराजांच्या मृत्यूची बीजे होती .
० अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह करणारा जगातला पहिला सत्याग्रही म्हणजे संत तुकाराम महाराज होय . ०
▪ महेश देवशोध ( राठोड )▪
०पोलीस योद्धा वृत्तसेवा ०
० संत तुकाराम महाराजांनी प्रचलित धर्मग्रंथांचे प्रामाण्य स्वतःही नाकारले आणि इतरांनाही नाकारण्यास सांगितले .————————–०
जेव्हा संत तुकाराम महाराजांचे घर दारही जप्त करण्याचा आदेश दिला तेव्हा संत तुकाराम महाराजांना त्याचं फार वाईट वाटलेले दिसत नाही. पण त्यांचे अभंग बुडवायला लावले ही गोष्ट त्यांच्या मनाला फारच लागली .
अभंग त्यांच्या हृदयाचे बोल होते . तो त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज होता. समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा आणि धार्मिक गुलामगिरीतून बाहेर काढाव, सर्वांभूती समत्त्व असलेला नवा समाज निर्माण करावा हे तुकाराम महाराजांनी आपलं जीवी ध्येय ठरवलं होतं.
ते त्यांचं स्वप्नच होतं. त्यासाठीच शब्दांची शस्त्र करून ते लढत होते. जीवावर उदार होऊन लढत होते. बुडणाऱ्या रयेते विषयी त्यांच्या मनात जो कळवळा दाटून येत होता, त्या कळवळयापोटी लढत होते. त्यांची ही अभिव्यक्ती याच साठी होती. ते जीवितकार्य जर करू दिलं जात नसेल तर मग जगायचं कशासाठी ? जगून उपयोग तरी काय ? स्वतःच्या हाताने सावकारीला तिलांजली दिली तेव्हाच घरादाराचा मोह सुटलेला होता. पण माणूस म्हणून अभिव्यक्त होण्याच माझं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात असेल तर त्या अन्यायाविरुद्ध मी लढेन शांततेच्या मार्गाने लढेन—-
० न्यायमूर्ती सावंत यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह करणारा जगातला पहिला सत्याग्रही म्हणजे तुकाराम महाराज होते वह्या बुडविल्या त्या क्षणापासून त्याच ठिकाणी अन्नपाण्याचा त्याग करून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आमरण उपोषणाला आरंभ केला. तेरा दिवस उपोषण केल्यानंतर त्यांची गाथा आपोआप वर आली आणि मग त्यांनी उपोषण सोडले असं सांगतात. पण प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या म्हणण्यानुसार हे उपोषण 18 दिवस चाललं अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्यानंतर पाच दिवस अन्न उदकावाचून तुकाराम महाराज विठ्ठला पुढे करुणा वचन भाकीत होते . परंतु त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्यांनी महाद्वारात धरणे धरले असे आणखी तेरा दिवस गेल्यावर त्यांना विठ्ठल बालवेशात भेटला वह्या सुरक्षित असल्याचे ज्ञात झाले. अन्नपाण्याविना राहण्याचा काळ अशाप्रकारे एकूण 18 दिवसाचा ठरतो असं डॉक्टर सदानंद मोरे लिहितात.
० आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ डॉक्टर सदानंद मोरे यांनी पुढे गाथेतल्या अभंगाच्या आधारे सविस्तर विवेचन केले आहे. जिज्ञासूंनी ते मुळातूनच वाचाव . पण अभंगाच्या वह्या बुडवायला लावल्यावर जगद्गुरु तुकाराम महाराजांची मनस्थिती कशी झाली होती त्याचं दर्शन आपल्याला या सर्वातून होत. आपल्यावर हा अन्याय होतो आहे, झाला आहे आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे , आपलं माणूसपण नाकारले जात आहे हा विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मनात क्षोभ निर्माण करणारा आणि त्यांना मरणदायी वेदना देणारा होता .
० गाथा पाण्यात बुडाली पण त्यातला विचार मात्र तरला तो बुडाला नाही कारण तोवर सर्वतोमुखी झाला होता . संत तुकाराम महाराजांनी असमानतेची , गैरबराबरीची उचनीचतेची , जातीपातीची व्यवस्था बदलण्यासाठी जीवाच्या आकांताने वैदिक ब्राह्मणाच्या विरोधात जो संघर्ष केला. वैदिकी ब्राह्मणी व्यवस्थेच्या संघर्षातचं संत तुकाराम महाराजांच्या मृत्यूचे बिजे होती .
० संत तुकाराम महाराज शोषित, पीडित लोकांचे दुःख चव्हाट्यावर मांडत होते. ज्या महामानवाला आपला आदर्श मानत होते त्या महामानवाच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करत होते. म्हणूनच संत तुकाराम महाराज आपल्याला जे सांगतात त्यातून आपण बोध घेतला पाहिजे , असत्याचे
नगारे कितीही जोरात बडवले जात असले, सत्या चा आवाज कितीही असला तरी आपण सत्याचाच पाठपुरावा केला पाहिजे कारण शेवटी सत्य शेवटी सत्य असतं. प्रचाराच्या ओघात आपण वाहून जाता कामा नये बहुमता पुढे झुकता कामा नये .
जे सत्याचाच मार्ग स्वीकारतील तेच संत तुकाराम महाराजांचे सच्चे वारस असतील आपण सच्चे वारस बनण्याचा प्रयत्न करू या !!!!!!—————-
▪ माजी संघटक▪
▪ अखिल भारतीय अंधश्रद्धा
निर्मूलन समिती ▪
▪ पोलीस योद्धा वृत्तसेवा▪
▪ महेश देवशोध ( राठोड )▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ▪
▪73 78 70 34 72 ▪