सोचणे समजनेवाली बात. . !
जगातल्या प्रत्येक समस्येवरील ऊपाय हा शिक्षणातून (पुस्तक वाचणातून) शोधु शकतो, पण जेव्हा हे मार्गच बंद आहेत तेव्हा आपण काय साध्य करणार आहोत, कोरोणा जाऊच नये अशी तर सरकारची योजना नसावी. . ? बसेसचे, मार्केटचे, दुकानाचे, टाईम कमी करणे, पॅसेंजर ट्रेन बंद ठेवणे यातून पर्यायाने गर्दी वाढविणे आणि कोरोना नियंत्रणाची भाषा करणे कुठेतरी समजण्यापलिकडचे वाटते.
रोज वाढणार्या महागाईबद्दल, रोजगाराच्या झालेल्या वाताहातीबद्दल, शेतकरी समस्येवर कुणी बोलूच नये अशी तर सरकारची ईच्छा नसावी. . ? जगातिल सर्वात मोठे लसिकरण भारतात होत असतांना भीतीयुक्त बातम्या प्रसारीत करण्याची गरजच काय. . ?
निसर्गापासून दुर चाललेलो आम्ही. . . केमीकल्सयुक्त आहाराच्या आहारी चाललेलो आम्ही. . . कधीतरी बिघडत चाललेल्या जीवनशैलीवर बोलणार आहोत का . . . ? कि कोराणाचे रडगाणे असेच सुरू ठेवणार. . . ! हा प्रश्न आता प्रत्येक जागृक नागरिक विचारतो आहे.