नागपुर ब्लॉग

वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान ( नागपूर ) अनेक वर्षां पासून पर्यावरण जन जागृती,

Summary

वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान ( नागपूर ) अनेक वर्षां पासून पर्यावरण जन जागृती, कोणतेही घरी किंवा बाहेर आवारातील आढळलेले प्राणी, साप, इत्यादिंना जिवनदान मिळाव व लोकांमध्ये पर्यावरणा बद्दल जनजागृती करण्याचे काम आमची संस्था पुर्वी काही वर्षांपासून […]

वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान ( नागपूर )
अनेक वर्षां पासून पर्यावरण जन जागृती, कोणतेही घरी किंवा बाहेर आवारातील आढळलेले प्राणी, साप, इत्यादिंना जिवनदान मिळाव व लोकांमध्ये पर्यावरणा बद्दल जनजागृती करण्याचे काम आमची संस्था पुर्वी काही वर्षांपासून करत आहे.

सुरवातीला फक्त गावामध्ये कामाला सुर्वात केली परंतु आता गाव खेड्यातून सुद्धा संस्थेला फोन यायला लागले 40 ते 50 कि.मी. च्या आतून सुद्धा रेस्क्यु साठी फोन येतात कधी अनेक प्राण्याचे अपघात होतात, तर कुठे प्राण्यांमुळे कधी सर्पदंश (साप चावल्याने ) लोकांना त्वरीत उपचारासाठी त्यांच्या पर्यंत पोहोचणे आम्हाला अवघड होते..

पावसाळ्यात सर्पदंश च्या घटना जास्त प्रमाणात होत असल्याने कधी तर लोकांना वेळेवर उपचार न मिळाल्यास कित्येक लोक मृत्युमुखी पडले.. परंतु संस्थेकडे मोठी गाडी नसल्या मुळे त्या ठिकाणी जाण्या साठी अनेक अडचणी येतात व त्या मुळे आम्ही मदत करण्यास असमर्थ ठरतो.

गावातून सुद्धा जेव्हां फोन येतात तेव्हा मोठे वाहन नसल्या मुळे गाडी साठी दोन दिवस वाट पाहवी लागते व त्या मुळे त्या प्राण्याला त्याच ठिकाणी ठेवा लागते व लोकांना वेळेस उपचार मिळत नाही त्या साठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.. आपल्या कडे जुनी किंवा सेकंड हँड कुठलेही चार चाकी गाडी असेल तर ती संस्थेला भेट द्यावी तुमच्या एका प्रयत्नांमुळे व मदती मुळे आम्ही अनेक मुक्या प्राण्यांचे व लोकांचे जीव वाचू शकणार✨🙏✨
वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था कन्हान ( नागपूर )
संपर्क करा-9284932557

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *