ब्लॉग

बहुसंख्य समाजाने सत्ताधारी बनावे. . !

Summary

मराठा- ओबिसी बांधव आरक्षण कोणाला मागतात. . . एका अल्पसंख्य सत्ताधारी वर्गाला कि जे नेहमीच त्यांना गुलामीत ढकलत आले आहेत. . . जगात एवढे लाजीरवाणे ऊदाहरण शोधून सापडणार नाही. . ..कि बहुसंख्य समाज अल्पसंख्य समाजाला सवलती मागतो. “जैसा सोचोगे वैसाही […]

मराठा- ओबिसी बांधव आरक्षण कोणाला मागतात. . . एका अल्पसंख्य सत्ताधारी वर्गाला कि जे नेहमीच त्यांना गुलामीत ढकलत आले आहेत. . . जगात एवढे लाजीरवाणे ऊदाहरण शोधून सापडणार नाही. . ..कि बहुसंख्य समाज अल्पसंख्य समाजाला सवलती मागतो. “जैसा सोचोगे वैसाही पाओगे” या निसर्गनियमानुसारही काहीच पदरात पडले नाही.
एकतर बहुसंख्य समाजाने स्वत:चा राजकिय पक्ष निर्माण करावा किंवा बहुजन समाज पार्टीला एकदा सत्ता देऊन बघावी. . . . मनुवादी पक्ष प्रायोजीत कार्यक्रम आता बंद झाले पाहीजे.. . . ज्या मनुवादी पक्षांनी तुमच्या महामानवांच्या सन्मानार्थ काहीच केले नाही . . ते तुम्हाला न्याय देतील? जे काही झाले ते ऊत्तर प्रदेशात झाले, शासन – प्रशासनात तुम्हाला वाटा देण्याईतपत ते मुर्ख नाही . . . त्यांना त्यांच्या मुलांची चिंता आहे . . तुमच्या नाही , हे लक्षात ठेवले पाहीजे.
जात- पात, धर्म, मंदीर, अंधश्रध्दा यांना तिलांजली देऊन आधी माणुस बना आणि संवैधानिक मार्गाने पेटून ऊठा आपल्या समस्या सोडवून अल्पसंख्य समाजाला काही देता येईल का बघा. . . हे सर्व तुम्ही शासनकर्ते बनुनच करू शकता. . . अन्यथा बर्बाद होणार्या पिढ्या बघण्याशिवाय कोणता मार्ग असेल तर सांगा. . ? असे परखड मत एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे हंसराजभाऊ कुंभारे माजी बसपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *