द_गोंड्स_आँफ_लाहेरी” चा नायक गेवा सोमा कुड्यामी पडद्याआड…..
माडिया गोंड किंवा माडिया किंवा मारिया हे महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यात राहणारे आणि छत्तीगडगड भारतातील बस्तर विभागातील आदिवासी गोंड जमातींपैकी एक आहेत. त्यांना भारत सरकारने आदिवासी गटाचा दर्जा मंजूर केला आहे. सकारात्मक कृती किंवा आरक्षण कार्यक्रम. माडिया गोंड्स नक्षलवादी कारवायांवर जोरदार परिणाम करतात. माडिया गोंड स्वत:ची पदवी माडिया वापरतात आणि ते ज्या ठिकाणी राहतात त्या माडिया देशाला कॉल करतात. ते गोंडीची माडिया बोली बोलतात. माडियाची बदलती शेती झूम म्हणून ओळखली जाते.एका अभ्यासानंतर माडिया गोंडांमध्ये राहणा-या वात्सल्य पद्धतीचा उल्लेख आहे. १९९७-९८मध्ये झालेल्या खंडपीठाच्या सर्वेक्षणातील निष्कर्षांपैकी: माडिया गोंड कुटुंबांपैकी ९१.०८ टक्के दारिद्र्य रेषेखालील रहात.
अनुसूचित जमाती/आदिवासी संस्कृती व जीवनाचे विद्यार्थ्यांना दर्शन व्हावे याकरीता १९९० च्या दशकात “द गोंड्स आँफ लाहेरी”असे शिर्षक असलेला इंग्रजी विषयात एक प्रकरण होते.यातील खरा नायक “मोगा गोंड उर्फ गेवा सोमा कड्यामी” गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या अती दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यातील लाहेरीची ओळख करून देणारा हा गावातील भुमीया मराठी समजणारा एकमेव आदिवासी.अधिकारी आले की जनजाती समाजाची व्यथा सांगणारा गांव व माणसाच्या विकासासाठी संघर्ष करनारा गावा गावात जाऊन आदिवासीना योजना,शिक्षण, नविन तंत्रज्ञान बाबत गोंडी भाषेत मार्गदर्शन करनारा “द गोंड्स आँफ लाहेरी” चा नायक आदिवासी नेता
८ नोव्हेंबर-२०२० ला पडद्याआड झाला…
परीसरातील जनजाती मोठ्या संख्येने मरणाला उपस्थित राहुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व एक लाकडी स्मृर्तीचिन्ह नागरिकांनी थडग्यावर उभे केले.
“द गोंड्स आँफ लाहेरी” नायक मोगा गोंड उर्फ गेवा सोमा कुड्यामी यास भावपूर्ण श्रद्धांजली…
💐💐💐💐💐💐💐💐
संकलन
भैय्याजी ऊईके
चंद्रपूर तालुका क्राईम न्युज रिपोर्टर, चंद्रपूर
bnuike@gmail.com