आरोग्य ब्लॉग

काकडीचा रस – बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर !

Summary

           काकडी आपल्याला सर्वांना माहिती आहे. काकडीचा वापर कोशिंबीर आणि सलादमध्ये केला जातो. त्याचप्रकारे काकडीचा रस पिऊन तुम्ही आरोग्यासंबंधित अनेक फायदे मिळवू शकता. काकडीमध्ये भरपूर न्यूट्रीशन असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात काकडीचा […]

           काकडी आपल्याला सर्वांना माहिती आहे. काकडीचा वापर कोशिंबीर आणि सलादमध्ये केला जातो. त्याचप्रकारे काकडीचा रस पिऊन तुम्ही आरोग्यासंबंधित अनेक फायदे मिळवू शकता.

काकडीमध्ये भरपूर न्यूट्रीशन असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात काकडीचा रस प्यायल्याने शरीरात दिवभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. त्यासोबतच काकडी शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्याचे महत्वाचे काम करते.

आता हवामानातील बदल दिसून येत असल्याने सकाळी आणि रात्री थंडीचा अनुभव तर दुपारच्या वेळी उष्णतेचा त्रास होत असल्याने, अशा वेळेस स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी काकडीचा रस पिणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा (Blood Pressure) त्रास खूप जास्त होत असले तर काकडीचा रस बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच काकडीचा रस पचनासाठीदेखील फायदेशीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *