युवक बिरादरी च्यावतीने युवक – युवतीसाठी विविध स्पर्धा श्रीरामपूर- येथील युवक बिरादरी भारत जिल्हा शाखेच्यावतीने 16 ते 28 वयोगटातील युवक – युवतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन 7 ऑगस्ट व 8 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा समन्वयक श्री सुनील साळवे यांनी दिली
युवक बिरादरी च्यावतीने
युवक – युवतीसाठी विविध स्पर्धा
श्रीरामपूर- येथील युवक बिरादरी भारत जिल्हा शाखेच्यावतीने 16 ते 28 वयोगटातील युवक – युवतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन 7 ऑगस्ट व 8 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा समन्वयक श्री सुनील साळवे यांनी दिली
रवींद्रनाथ टागोर यांचे पुण्यतिथीनिमित्त 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 1 तबला,ढोलक वादन, दुपार 2 ते 4 हार्मोनियम,सिंथेसायझेर, तर सायंकाळी 5 वाजता बासरी,संतूर,सिणार, शहनाई आदी स्पर्धा होतील
8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 4 यावेळेत कथाकथन ,तर 5 वाजता स्वरचीत काव्यवाचन स्पर्धा होणार आहेत
सर्व स्पर्धांसाठी वेळ 7 मिनिटे असेल,सर्व स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकास रोख रक्कम,ट्रॉफी,प्रमाणपत्र दिले जाईल
प्रत्येक स्पर्धेतील प्रथम येणाऱ्या स्पर्धकास जानेवारी 2022 मध्ये मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत भाग असणार आहे
स्पर्धकांनी आपली नावे नक्षत्र कलेक्शन गांधी पुतळ्या जवळ श्रीरामपूर,अथवा सेठी मेडिकल गांधी पुतळ्यासमोर याठिकाणी नोंदवावीत. कोरोना परिस्थिती नुसार स्पर्धेचे ठिकाण फोनवर आगोदर कळविले जाईल. वाद्य साहित्य स्वतःचे आणावे.
युवक- युवतींनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन युवक बिरादरी संस्थापक क्रांतिभाई शाह, प्रमुख संचालक सुनील वालावलकर,स्पर्धा प्रमुख नंदकुमार पाटील ,स्पर्धा संयोजक के के आव्हाड,सुनील साळवे,प्रमोद पत्की,संजय जोशी,प्रवीण साळवे,पोपटराव शेळके,शैलेश भणगे,संतोष जाधव,प्रकाश जाधव,अजय घोगरे,सागर गिरणारे,विनीत कुंकुलोळ,प्रेमभाई सोनुने,नितीन राऊत, लहानू त्रिभुवन,साहेबराव।रकटे,विशाल निंभोरे,सुरेश वाघुले,सुखदेव शेरे,राजेंद्र केदारी,सुरंजन साळवे,बाळासाहेब पाटोळे,ऍड पराग कारखानीस,उषाताई गाडेकर,सुनीता वढणे, शोभा शेंडगे,सविता साळुंके,मधूवंती धर्माधिकारी,सुप्रिया साळवे, डॉ पूजा बोर्डे,प्रतिभा विखे,श्वेता साळवे,अपूर्वा वराळे,अश्विनी लबडे,अश्विनी लिपटे आदींनी केले आहे.
श्री सुनील प्रभाकर साळवे
श्रीरामपूर तालुका न्युज रिपोर्टर
जिल्हा- अहमदनगर
राज्य- महाराष्ट्र