महाराष्ट्र हेडलाइन

50 लोकांच्या उपस्थितीत शासनाने महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी – संयुक्त लोकशाही आघाडी ची मागणी

Summary

भंडारा, दरवर्षी 14 एप्रिल, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. जगातील सर्वात मोठे अर्थतज्ञ, कायदेतज्ज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्या महामानवाने कायद्याचे पालन करून अनेक आंदोलन करून या शोषित पिडीत बहुजन समाजाला सामाजिक व मानसिक […]

भंडारा,
दरवर्षी 14 एप्रिल, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. जगातील सर्वात मोठे अर्थतज्ञ, कायदेतज्ज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्या महामानवाने कायद्याचे पालन करून अनेक आंदोलन करून या शोषित पिडीत बहुजन समाजाला सामाजिक व मानसिक गुलामगिरीतुन मुक्त केले, व विज्ञानाची कास दिली. अश्या महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती कोरोना काळात आली आहे, समाजातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष व राज्य सरकार विरोधात रोष आहे, सोशल मिडीयाचा माध्यमातून दिसुन येते, मागील वर्षी देखील जयंती साजरी करण्यात आली नाही.
परंतु राज्य सरकारने जसे 50 लोकांच्या उपस्थितीत कोरोना काळात लग्न समारंभात दिलेल्या परवानगी दिली त्या नुसार आपण, दि.14 एप्रिल रोजी, सकाळी 9.00 ते 12.00 वाजता या ठरावीक वेळी जिल्हयातील प्रत्येक गावातील बुध्द विहारात कुठलाही मिरवणूक न काढता, सांस्कृतिक् कार्यक्रमन आयोजित न करता, बुदध विहार समीती पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांना, महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी परवानगी द्यावी.
बहुजन समाजाची ओळख संयमी व शांत असीच आहे, शासनाचे कोवीड 19 चे नियम पालन करण्यात येईल.
असे निवेदन मा. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवासी उपजिल्हाधीकारी अर्चना यादव यांच्या मार्फत संयुक्त लोकशाही आघाडी च्या वतीने शशिकांत भोयर, अध्यक्ष बुद्धीस्ट युथ फोर्स, अचल मेश्राम, जेष्ठ नेते रिपब्लिकन सेना, डाॅ देवानंद नंदागवळी, महाराष्ट्र राज्य प्रभारी केंद्रीय मानवाधिकार संघटना
मनोज खोब्रागडे, विदर्भ प्रभारी रिपब्लिकन सेना, राहुल वानखेडे, अध्यक्ष दलीत पॅथर
रेखा टेंभुणे, अध्यक्ष महीला आघाडी रिपब्लिकन सेना भंडारा जिल्हा
श्रीराम बोरकर, अध्यक्ष समता सैनिक दल भंडारा तालुका, शिवदास गजभिये, अध्यक्ष, लोकजनशक्ती पार्टी भंडारा, नाशिक चवरे, सरपंच सेवा संघ, अंबादास नागदेवे, अध्यक्ष राष्ट्रीय अमर कला निकेतन महाराष्ट्र, रोशन जांभुळकर, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भीमशक्ती संघटना, तुळशीराम गेडाम, अध्यक्ष सम्राट अशोक सेना, माधव नारनवरे, अध्यक्ष रिपब्लिकन दलीत पॅथर भंडारा, अँड. पदमाकर टेंभुणीकर, विदर्भ राज्य आघाडी, धम्मपाल गजभिये, भंडारा गोंदीया प्रमुख ऐसीजेपी, केतनभाऊ मेश्राम, अध्यक्ष नवयुवक रोजगार पार्टी, शशिकांत देशपांडे सदस्य आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *