5 दिवस पालिकेने कचरा उचलला नाही म्हणून नागरिक झाले आक्रमक….. कचरा उचला नाहीतर पालिकेत येऊन टाकणार रहिवाश्याचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा…. डोंबिवलीच्या पालिकेत जाऊन रहिवाश्यांनी अधिकाऱ्यांना घेतले धारेवर…
डोंबिवली : कचऱ्याची विल्हेवाट बड्या सोसायट्यांनी त्यांच्या आवारातच लावावी असे सांगत पालिका प्रशा सनाने पालिका हद्दीतील बड्या संकुलांचा कचरा उचलणे बंद केले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून सोसायटीत पालिकेची घंटागाडी न आल्याने डोंबिवलीतील बालाजी गार्डन सोसायटीतील रहिवासी हैराण झाले आहेत. संतप्त रहिवाशांनी गुरुवारी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या समोर आपली समस्या मांडत पालिका अधिकाऱ्यांना धारेवर घेतले आणि कचरा उचला नाहीतर पालिकेत येऊन टाकणार असाच इशाराच पालिका अधिकाऱ्यांना दिला.
डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड येथील बालाजी गार्डनमध्ये 9 सोसायट्या असून 522 सदनिका असून 2 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. दरवर्षाला 55 लाख रुपये कर भरुनही पालिका प्रशासन रहिवाशांना सहकार्य करीत नाही. सोसायटी आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही. तसेच गेल्या चार पाच दिवसांपासून कचरा उचलला न गेल्याने आवारात दुर्गंधी पसरली आहे. तसेच ते पालिकेच्या सूचनांनुसार आम्ही ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन देत असतात.मात्र सहकार्य करण्यास पालिका टाळाटाळ करते असल्यामुळे रहिवाशांनी आमदार राजू पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे समस्या मांडली. गुरुवारी आमदार पाटील यांनी रहिवाशांसह पालिकेचे घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेतली.यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या समोर आपली समस्या मांडत पालिका अधिकाऱ्यांना धारेवर घेतले आणि कचरा उचला नाहीतर पालिकेत येऊन टाकणार असाच इशाराच पालिका अधिकाऱ्यांना दिला.तर मनसे आमदार यांनी सांगितले की लॉकडाऊन आणि कोविड लोक परिस्थिती बिकट झाली आहे त्यांना जबरदस्ती न करता कचरा वर्गीकरण मदत करा ते पण सहकार्य करतील, नागरिकांना गनपॉईंट ठेवून काम होणार नाही असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.त्यामुळे आता पालिका कचरा उचलते का हे पाहावे लागेल….
जगदीश जावळे
ठाणे