BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

सिल्लोड येथे पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले वृक्षारोपण वृक्षारोपण एक राष्ट्रीय कार्यक्रम; जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे अवाहन

Summary

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.13, राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील नगर परिषदेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमास नगराध्यक्षा राजश्री निकम, […]

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.13, राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील नगर परिषदेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमास नगराध्यक्षा राजश्री निकम, युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, डॉ.संजय जामकर, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सलीम हुसेन, शंकरराव खांडवे, राजू गौर ,रईस मुजावर, मोईन पठाण, युवासेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, मारुती वराडे , शेख इम्रान, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

आजच्या कोरोना संकटात ऑक्सिजनच्या रूपाने वृक्ष आपल्या जीवनात किती महत्वाची भूमिका बजावत असतात हे सर्वांच्या लक्षात आले. वृक्ष लागवड जर झाली नाही आणि आहे ते वृक्ष जर तोडत राहिले तर आपण विचार ही करू शकत नाही असे किती तरी समस्या निर्माण होतील असे स्पष्ट करीत आहे त्या वृक्षांचे रक्षण करणे ,नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना मिळावी , पर्यावरण संतुलन रहावे यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे .नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना देणारी वृक्ष नगर परिषदेने मोफत उपलब्ध करून दिली आहेत. आपल्याला हे वृक्ष लागवड करून संगोपन करणे आहे. वृक्षारोपण हे एक राष्ट्रीय कार्यक्रम असून या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी असे आवाहन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी केले.

यावेळी अक्षय मगर, गौरव सहारे, शैलेश कटारिया यांच्यासह नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी अझहर पठाण, प्रशासकीय अधिकारी सुनील गोराडे, सय्यद सलीमोद्दीन, अजगर पठाण, शेख अजीम, अल्का सूर्यवंशी , श्रीराम काथार, शेख सलमान, प्रभाकर शिंदे, नरेश मगरे, रणजित भालेराव आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *