BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

🔹 भारताच्या कोरोना महामारी हाताळणीवर जगभऱ्यातून होतेय टीका 🔹 🔸आंतरराष्ट्र प्रसारमाध्यमातून केंद्र सरकारच्या आत्मसंतुष्ट पणाचे काढले वाभाडे 🔸 🔹चुकीच्या निर्णयानी भारताने कोरोना चा पेच आणखी गम्भीर केला 🔹 🔸मोदींचा अतिआत्मविश्वास भोवला 🔸 🔹भारताचे सातत्याने अपयश हे जागतिक स्तरावर परिणाम करणारे आहे 🔹

Summary

पोलीस योद्धा वृत्त संस्था, देशात दररोज कोरोना रुग्णांचा आणि विषाणूच्या बळीचा नवा कळस समोर येत असताना जगभरातील माध्यमानी भारताच्या कोरोना हाताळनितील दोष दाखवताना टीकेचा चढा सूर लावला आहे. दुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्य व्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे . प्राणवायू टाक्या […]

पोलीस योद्धा वृत्त संस्था,

देशात दररोज कोरोना रुग्णांचा आणि विषाणूच्या बळीचा नवा कळस समोर येत असताना जगभरातील माध्यमानी भारताच्या कोरोना हाताळनितील दोष दाखवताना टीकेचा चढा सूर लावला आहे.
दुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्य व्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे . प्राणवायू टाक्या ,खाटा, रेमदेसीविर सारखी औषधे यांचा तूटवडा आहे. काही ठिकाणी त्यांचा कालाबाजारही होत आहे .दिल्लीत रुग्ण च प्राणवायू सिलेंडर घेऊन येतांना दिसले . गेल्या वर्षी स्थलांतरित्यांचे जे लोंढे दिसले त्याची पुनरावृत्ती या वेळीही झाली . या वास्तवाचे तपशिलात वृत्तांकन आंतरराष्ट्रीय।माध्यमांनी केलेले आहेच ,पण परदेशी दैनिकांच्या वृत्तलेख व संपादकीयांनी भारतीय नेतृत्वाच्या गफलतींचाही पाढा वाचला आहे.
प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांच्या स्वतः च्या आकलनाने काही निर्णय घेतले. तज्ञांच्या
इ शाऱ्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या चुकांचे परिणाम आज भोगावे लागत आहे, असे ब्रिटनच्या gardiyan (गर्दीयन) वृत्त पत्राने अग्रलेखात म्हटले आहे. ” नरेंद्र मोदींच्या अतिआत्मविश्वासामुळे
हे सारे घडले . मोदींनी तज्ञांचा सल्ला घेऊन निर्बध कसें राखावेत
याचा विचार करायला हवा होता. आपण जे बोलतो ते करतो हे दाखवायला हवे होते. भविष्यातील इतिहासकार या निर्णया बाबत मोदींचे कठोर मूल्यमापन करतील ” असेही या अग्रलेखात म्हटले आहे.
अमेरिकेतील ‘ वॉशिंग्टन पोस्ट ‘ या महत्वाच्या वृत्तपत्राने भारतात ताळेबंदी फार आधी लावल्या बाबत टीकास्त्र सोडले आहेच आणि दुसरी लाट वाढत असून सुद्धा क्रिकेट, कुंभमेळा आणि इतर धार्मिक कार्यक्रम कुठल्याही नियमविना साजरे झाल्याबद्दल त्यांनी केंद्रीय नेतृत्वाचे वाभाडे काढले . हे सारे टाळता आले असते , याकडे त्यांनी लक्ष वेधले. ” बी बी सी ने भारतीय आरोग्य यंत्रणेतील ढिसा ळ कारभारावर बोट ठेवले.
” या सगळया स प्रधानमंत्री मोदी जबाबदार आहे अनेक इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मंत्रिमंडळातिल मंत्री खुशामतखोर आहे , त्यांनी कोविड 19 लाट यशस्वीपणे हाताळल्याबाबत मोदींची प्रशंसा तेवढी केली .त्यांनतर चाचण्या कमी झाल्या. लोक विषाणू गेला असे वर्तन आत्मसंतुष्टतेतून करू लागले ते अंगाशी आले आहे. ”
असे परखडपणे सूनवणाऱ्या वृत्त लेखात ” टाईम ” साप्ताहिकाने
म्हटले आहे की महाराष्ट्रातील परिस्थिती ही राज्यातील राजकारण्यांनी एकमेकांवर कुरघोड्याचे राजकारण केल्याने बिघडली.
विषाणूची लाट परत आली तेव्हा हे गाफील होते व जेव्हा खरे काही करायचे होते तेंव्हा राजकारण करीत राहिले, असेही ‘ टाईम ‘ लेखात म्हटले आहे.
” कोविड 19 बाबत आत्मसंतुष्टता भारताला नडली
त्यामुळे आताची दुरावस्था ओढवली आहे . रुग्णाची संख्या खूप वाढत आहे . गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे. पण हा सगळा प्रकार योग्य धोरणे राबवली असती तर टाळता आला असता ,” असे अस्ट्रेलियाच्या ‘ ए बी सी ‘ वृत्त संस्था ने म्हटले आहे.
चीनच्या ‘ ग्लोबल टाईम ‘ आणि पाकिस्तान च्या ‘ डॉन ‘ वृतपत्रानेही भारताच्या कोरोना हाताळणीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे .

🔹पोलीस योद्धा वृत्त सेवा🔹
🔸महेश देवशोध (राठोड)🔸
🔹 वर्धा, जिल्हा प्रतिनिधी🔹
🔸7378703472 🔸

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *