BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

🔵 जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात उसळली रेकॉर्ड करणारी गर्दी 🔵 🔴 उड्डाणपूलावर तासभर वाहतूक विस्कळीत 🔴 ⚫ वाहतूक सुरळीत करतांना पोलिसांची कसरत ⚫ ⭕ वेळेपूर्वी च भाजीबाजार आवरता घेण्याची वेळ ⭕

Summary

♦️वर्धा , जिल्हा प्रतिनिधी : ♦️ 🎯 कोरोना ची साखळी तोडण्याकरिता प्रशासनाच्या वतीने 5 दिवसांचे कडक निर्बंध आज 8 मे पासून लागू होणार आहेत. पाच दिवसांचे निर्बंध असल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी सह वाहनात पेट्रोल भरण्याकरिता गर्दी केली. बाजारात गर्दी […]

♦️वर्धा , जिल्हा प्रतिनिधी : ♦️

🎯 कोरोना ची साखळी तोडण्याकरिता प्रशासनाच्या वतीने 5 दिवसांचे कडक निर्बंध आज 8 मे पासून लागू होणार आहेत. पाच दिवसांचे निर्बंध असल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी सह वाहनात पेट्रोल भरण्याकरिता गर्दी केली. बाजारात गर्दी तोंडात बोटं टाकायला लावणारी होती.
उड्डाण पुलावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढील चौकात तर वाहतूक कोंडी अनुभवायला आली. जवळपास दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना धाव घ्यावी लागली. ब्रेक द चैन अंतर्गत विविध निर्बंध आहेत , त्यात जीवनावश्यक वस्तू ची दुकाने ,अत्यावश्यक सेवा ,पेट्रोल पंप सकाळी 7 ते 11 वाजतापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र सातत्याने रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने पाच दिवसाचे कडक निर्बंध लावण्याचे आदेश दिलेत, त्यामध्ये वैद्यकीय सेवा, मेडिकल, पशुचिकित्सा वगळता इतर बाबींवर निर्बंध घालण्यात आलेत. कोरोना शी सबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. आज पासून हे निर्बंध सकाळी 7 वाजता पासून सुरु झाले म्हणजे 8 मे ते 13 मे च्या सकाळी सात वाजेपर्यंत हे निर्बंध असतील . पण निर्बंध लागू होण्याच्या अनुषंगाने आज 7 मे रोजी नागरिकांनी सकाळीच बाजारपेठेत धाव घेतली. शहरातिल सर्वच रस्ते सकाळच्या प्रहरात गर्दीने गजबजलेले होते. बाजारात उसळलेली गर्दी सर्वांनाच थक्क करायला लावणारी होती. भाजी बाजार ,किराणा दुकान, डेअरी,बेकरी, डेलीनीड्सच्या दुकानासमोर ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या, पोलिसांची वाहतूक सुरळीत करतांना दमछाक झाली यापूर्वी अशी गर्दी बघितली नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांत व्यक्त होत होत्या .🎯
🔸प्रशासनाने एक दिवस वेळ वाढवायला काय हरकत होती ?असे नागरिक बोलत होते 🔸
🔹पेट्रोल पंप उघडण्यापूर्वीच ग्राहकांच्या लांबलचक रांगा 🔹
🔺 500 रुपयांच्या वरूनच बहुतांश चालकांनी वाहनात पेट्रोल भरले 🔻

♦️पोलीस योद्धा वृत्त सेवा ♦️
♦️महेश देवशोध (राठोड )♦️
♦️वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ♦️
♦️7378703472 ♦️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *