महाराष्ट्र हेडलाइन

🔴 शिक्षण संस्थानी 🔴 🔴 शिक्षण शुल्क 🔴 🔴वसूल करताना 🔴 🔴न्यायालयाचाआदेश 🔴 🔴पाळावा 🔴 ⚫ अन्यथा , संस्था विरोधात आंदोलन, जिजाऊ ब्रिगेड चा इशा रा ⚫

Summary

♦️वर्धा , जिल्हा प्रतिनिधी :-♦️ ♦️ शिक्षण संस्थानी पालकांकडून पूर्ण फी वसूल करू नये , असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून , या निर्णयाचे जिजाऊ ब्रिगेड ने स्वागत केले आहे . या बरोबरच न्यायालयाचा आदेश धुडकावून अवाजवी शुल्क वसूल केल्यास […]

♦️वर्धा , जिल्हा प्रतिनिधी :-♦️

♦️ शिक्षण संस्थानी पालकांकडून पूर्ण फी वसूल करू नये , असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून , या निर्णयाचे जिजाऊ ब्रिगेड ने स्वागत केले आहे . या बरोबरच न्यायालयाचा आदेश धुडकावून अवाजवी शुल्क वसूल केल्यास शिक्षण संस्था विरोधात राज्य भर तीव्र आंदोलने करण्यात येतील, असा इ शा रा जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांनी दिला आहे. ज्या विद्यार्थांच्या पालकांना संस्थेकडून फी वसुली साठी तगादा लावला जात असेल , अश्या पालकांनी जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन ही माधुरी भदाणे यांनी केले आहे.
गेल्या वर्षभरापासून लॉक डाऊन मूळे सर्व सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. अश्या परिस्थितीत आपल्या कुटूंबातील पाल्यांचा शिक्षणाचा खर्च कसा करावा ? असा प्रश्न प्रत्येक कुटुंबापुढे उभा आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शुल्क अव्वाच्या सव्वा झाले आहे. अशातच संस्था चालकांचा फी साठी पालकांकडे तगादा असतो.
एकतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा ऑनलाइन सुरू असल्याने संस्थांवर इतर खर्चाचा भार नाही . या उलट पालकांना मात्र आपल्या पाल्यांना
ऑनलाइन शिक्षणासाठी महागडे मोबाइल घेऊन द्यावे लागत आहेत. वरून दर महिन्याचा मोबाइल रिचार्ज चा खर्च वेगळाच ,असा आर्थिक भार पालकांना पेलावा लागत आहे.
खाजगी शिक्षण संस्थांनी पालकांपासून वाढीव फी वसुली करू नये, असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे,
तरीही खाजगी शिक्षण संस्था शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावत असेल तर जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांशी त्वरीत संपर्क साधावा आम्ही त्या संस्था विरोधात रस्त्यावर उतरू असा इ शा रा जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशा ध्यक्षा माधुरी भदाणे यांनी दिला आहे.

♦️पोलीस योद्धा वृत्त सेवा ♦️
♦️महेश देवशोध (राठोड )♦️
♦️वर्धा, जिल्हा प्रतिनिधी ♦️
♦️7378703472 ♦️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *