BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

▪मोदी लाटेचा अंत झाला!▪ ▪देशाचे अच्छे दिन ऐवजी लुच्छे दिन आ गये▪ ▪चार राज्याच्या निकलांपेक्षा पश्चिम बंगालचा निकाल देशाच्या राजकारणावर अधिक प्रभाव टाकणारा आणि लोकमन व्यक्त करणारा ठरलाय .▪

Summary

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा ▪ जग कधीच कुणाचं किंवा कुणासाठी नसतं. ते आपलंसं करावं लागतं. त्यासाठी लढावं लागतं. तरच ते आपलं होत. आपल राहत . हे ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल महाविजयातून नुकतच दाखवून दिलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ‘ […]

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा ▪

जग कधीच कुणाचं किंवा कुणासाठी नसतं. ते आपलंसं करावं लागतं. त्यासाठी लढावं लागतं. तरच ते आपलं होत. आपल राहत . हे ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल महाविजयातून नुकतच दाखवून दिलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ‘ भाजपच्या ‘ अच्छे दिन च्या घोषाने देशात ‘मोदी लाट’ निर्माण झाली. लोकांना बनवण्याची – पटवण्याची सर्व साधन ,ट्रिक्स वापरून देशात ‘ भाजप व मित्र पक्षाची सत्ता आली. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले . पण देशात अच्छे दिन ऐवजी लुच्छे दिन सुरु झाले. सत्तेचा वापर विरोधकांना
‘ ब्लॅकमेल करून ‘भाजप ‘ मध्ये ओ ढू न आणण्यासाठी करण्यात आला. सत्तेसाठी च बळ देणाऱ्या मित्र पक्षांना संपवण्यासाठी करण्यात आला . त्या साठी सरकारी यंत्रणाबरोबर ‘ सोशल मीडिया’ चा वापर अत्यंत नीच पद्धतीने करण्यात आला.
तथापि , लाट समुद्राची असो , ‘ कोरोना ‘ ची अ सो !!!!!
वा मोदींची असो लाटेला अंत
हा असतोच ! तो अंत लांबवण्यासाठी भक्तांना गुंगवणं आणि लोकांना वादात गुंतवणे आवश्यक असते. ते काम मोदी शहा जोडी गेली सात वर्षे करीत आहेत . त्यासाठी गोहत्या बंदी ,
नोटबंदी , जी एस टी, ए न आ र सी , पुलवामा चा दहशतवादी हल्ला, बालाकोट ऑपरेशन असे अनेक चर्चेत आणले . त्या जोरावर 2019 ची लोकसभा निवडणूक ‘भाजप’ ने बहु मता ने
जिंकली.
तथापि , ही पायाला काठ्या लावून उंची वाढवून दाखवण्याची हरामखोरी आहे,हे लोकांच्या लक्षात आलं. ते राज्यातल्या विधानसभा निवडणुकांतून जनतेने वेळोवेळी दाखवून ही दिलय.
मंदिर -मशिदवादाच्या आधारे -भा जप-ने गेल्या 30 वर्षात सत्तेच्या
दिशेने केलेल्या घोडदौडित, गोवा
आणि गुजरात ही राज्य कथित हिंदुत्ववादाची अनुक्रमे प्रयोगशाळा आणि कृतीशाळा राहीली आहेत. तथापि,2014 च्या ‘ मोदी ला टे नंतर 2017
मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ह्या दोन्ही राज्यात भाजप ची घसरण झाली आहे.
गोव्यात कांग्रेस पक्ष एक क्रमांकावर आला, पण बहुमत मिळाले नाही. तथापि ,भाजप नेत्यांनी केंद्र सत्तेची ताकद वापरून कांग्रेस मध्ये फूट पाडली. आणि इतर पक्षांना घेऊन सरकार बनवले त्या साठी मनोहर पर्रीकर यांना देशाचे संरक्षण मंत्री
पद सोडून मुख्यमंत्री म्हणून गोव्यात परतावं लागलं.
गुजरतेतही भाजपची घसरण झाली . भाजपला बहुमत मिळालं, पण भाजपाच्या जागा 2012 च्या
विधानसभा निवडणुकीत 117
होत्या ,त्या 2019 च्या निवडणूकी त 99 झाल्या कांग्रेस ने 59 वरून 77 वर उडी मारली.
182 च्या विधानसभेत काँग्रेस बहुमतासाठीचा 91 हा आ कडा
भाजपमधून सत्तेपासून दुरावलेल्या नां घेऊ न पार करू शकते, हे लक्षात आल्यावर भाजपने कांग्रेस च्या आमदारांना भाजपवासी करून आ पली ताकत 117 वाढवली .
2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या पक्षांनी एकत्र येऊन
भाजपचा सफाया केल्यावर , मोदी शहा जोडीने सत्तेची ताकत वापरून लालूप्रसाद यांना जेल मध्ये अडकून ठेवलं आणि 2020
च्या विधानसभा निवडणुकी साठी
नितीश कुमार यांना भाजपशी युती करण्यास भाग पाडले. तरीही लालूपुत्र तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार – मोदी – शहा युतीला जेरीस आणले . ह्या युती
ला जेमतेम बहुमत मिळालं आणि
तेजस्वी यादव हिरो ठरले .
आसामात भाजप ला सत्ता मिळाली 126 पैकी 60 जागा जिंकल्यामुळे बहुमत मिळाले नाही . पांडेंचेरीत कुठल्याच पक्षाला बहुमत नसल्याने तिथे तोडफोडीच राजकारण पुढच्या निवडणुका पर्यंत होत राहील . केरलातील
डाव्यांची पुन्हा सत्ता आलीय.
तामिळनाडू त करुणानिधी
पुत्र स्टॅलिन ह्याने द्रमुकची सत्ता
आणलीय . ह्या चार राज्यांतल्या
निकालांपेक्षा पश्चिम बंगाल चा
निकाल देशाच्या राजकारणावर
अधिक प्रभाव टाकणारा आणि
लोकमन व्यक्त करणारा ठरलाय.
कारण ह्या निकालाने ‘ मोदी लाटेचा ‘ अंत दाखवलाय. तो समजून घेऊन वागण्यात लोकहीत आणि देशभक्ती आहे.
2018 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर कर्नाटकात काँग्रेस आणि देवेगौडा यांच्या जनतादल (सेक्युलर ) युतीच सरकार स्थापन झाले. त्यांच्यातल्या मतभेदाचा फायदा भाजपने घेतला. दोन्ही पक्षाचे आमदार फोडले आणि आपलं सरकार स्थापन केले. मोदी लाटे नंतर
महाराष्ट्रात लवकरच झालेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी असलेली 25 वर्षाची युती तोडण्यापर्यंत मजल मारली.
ह्या संभाव्य दग्याचा अंदाज घेऊन
शिवसेना नेतृत्व वेळीच सावध झालं .

असतं तर आत्ताचे महाविकास आघाडीचे चित्र तेव्हाच निर्माण झालं असतं. त्यावेळी भाजपला स्वतंत्र पणे निवडणूक लढवून बहुमताचा आकडा गाठता आला नाही. तरीही सर्वात मोठा पक्ष म्हणून फडणवीस सरकार स्थापन झाले , पण बहुमत
प्राप्तीसाठी शिवसेनेला सरकारात सामील करून घेतांना आणि पुढे 2019 च्या लोकसभा- विधानसभा निवडणुकीत युती करण्यासाठी मोदी-शहा-फडणवीस यांना शिवसेना नेतृत्वा सोबत बऱ्याच उठ बश्या काढाव्या लागल्या . आणा भाका घ्या व्या लागल्या .
यावेळी आंध्रप्रदेशात 2019 मध्ये
झालेल्या विधानसभा निवडणुकात जगमोहन रेड्डी यांच्या ( YSRCP ) पक्षाने 175
पैकी 151 जागा जिंकल्या . तर
त्याच वेळी ओडिशात झालेल्या निवडणुकीत नवीन पटनायक यांच्या ( BJ D ) पक्षाने 147 पैकी 112 जागा जिंकल्या .
त्या आधी 2018 मध्ये तेलंगणात
झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखरराव यांच्या ( T R S ) पक्षाने 119 पैकी 88
जागा जिंकल्या . हे सगळे प्रादेशिक नेते आणि पक्ष आहेत.
अशीच कामगिरी पंजाबात 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने केली आणि तेथे डॉ. अमरीदंर सिंग यांचं सरकार आलं.
2018 च्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान आणि मध्यप्रदेशांत काँग्रेस सरकार भाजप च सरकार पाडून आलं.
राजस्थानात अशोक गहलोत मुख्यमंत्री झाले तर मध्यप्रदेशा त कमलनाथ मुख्यमंत्री झाले .
बाकी पुढील लेखात—–

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा▪
▪महेश देवशोध ( राठोड )▪
▪वर्धा, जिल्हा प्रतिनिधी ▪
▪7378703472▪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *