महाराष्ट्र हेडलाइन

▪महा आणि बाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे ▪ ▪आता संघर्षाशिवाय पर्याय नाही ▪ ▪संघर्ष लोकहितासाठी असतो पण ▪ ▪नोकरशाही, न्यायव्यवस्था, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे सरकारचे बटीक बनले असेल तर —– ▪ ▪प्रकाश पोहरे यांचा प्रहार▪

Summary

▪पोलीस योद्धा स्पेशल▪ न्यायव्यवस्था , प्रसारमाध्यमे व नोकरशहा एकीकडे आणि संसद दुसरीकडे अशा संघर्षातून लोकशाही बळकट होत राहते , कारण हा संघर्ष लोकहितासाठी असतो, पण नोकरशाही व न्यायव्यवस्था सरकारच्याच हातात आहे. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे सरकारचीच बटीक बनले आहेत. व्यावसायिक हितसंबंध असलेल्या […]

▪पोलीस योद्धा स्पेशल▪

न्यायव्यवस्था , प्रसारमाध्यमे व
नोकरशहा एकीकडे आणि संसद दुसरीकडे अशा संघर्षातून लोकशाही बळकट होत राहते ,
कारण हा संघर्ष लोकहितासाठी असतो, पण नोकरशाही व न्यायव्यवस्था सरकारच्याच हातात आहे. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे सरकारचीच बटीक
बनले आहेत. व्यावसायिक हितसंबंध असलेल्या प्रसारमध्यमांचा सरकारविरोधातील आवाज क्षीण झाला आहे. तसे झाल्यामुळे आपली वाटचाल अराजकाच्या दिशेने सुरू आहे .
आज देशामध्ये
‘ महा-आणीबाणी ‘ ची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही आणीबाणी अघोषित आहे, परंतु या आणीबाणीने ,१९७५ साली या देशात जी आणीबाणी घोषित करण्यात आली होती त्या आणीबाणीलाही लाजवेल अशी परिस्थिती निर्माण केली आहे.
१९७५ सालची आणीबाणी ही जनतेला जाहीर करून कळवण्यात आली होती आणि संविधानाच्या तरतुदींचा आधार घेऊन ती जाहीर करण्यात आली होती. पण आजची जनतेला अंधारात ठेवून ,घटनेची पायमल्ली करून, गुपचूप आणण्यात आली आहे. आज देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात नाही. उलट घटनेला गुंडाळून ,सर्व कायदेकानून धाब्यावर बसवून, विरोधकांकडून अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आणि सर्व गरीब जनता यांचा चहुबाजूंनी कोंडमारा करण्यात येत आहे.
आजच्या राजवटीला सर्व
आघाड्यांवर अपयश आल्यावर ही राजवट आता एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे कारभार करायला लागली आहे.
हे अनेक घटनांचा आढावा घेतला तर स्पष्ट होते.
त्याचे अलिकडचे उदाहरण म्हणजे कबीर कला मंच च्या कार्यकर्त्यांवर जे छा पे टाकण्यात आले त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे ते आहे.
आजच्या राजवटीचे दुसरे उदाहरण म्हणजे या राजवटीचे जे समर्थक आहेत्यांनी कितीही आणि कसल्याही प्रकारचे गुन्हे केले तरी त्यांना अटक करण्यात येत नाही. अटक झाली च तर त्यांच्या गुन्हयाची चौकशी करण्यात येत नाही. चौकशी करण्यात आली तरी त्यात कित्येक ढोबळ चूका ठेवण्यात येत आहेत . हेतू हा की त्यांना कोणतीही शिक्षा होऊ नये आणि शिक्षा झाली तरी त्यांची सोडवणूक करण्यात येत आहे.
अर्णव गोस्वामी प्रकरणात ही बाब प्रकर्षाने जाणवते खरे म्हणजे अर्णव गोस्वामी च्या व्हाट्सएपच्या चाट मधून अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत आणि त्यावरून त्यांनी केलेली कृत्य हि देशद्रोह या श्रेणी मध्ये येतात, असे असताना अर्णव गोस्वामी च्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून प्रकरण जेव्हा खालच्या कोर्टात होते त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकणात हस्तक्षेप करून अर्णव गोस्वामी ला जामीन
मिळवून दिला. अर्णव गोस्वामी हा केवळ भाजपचा सुपरिबाज पत्रकार नाही तर त्याच्यावर आर्किटेक्ट अनव्य नाईक याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
याच कडील अगदी ताजे उदाहरण म्हणजे मुकेश परमविरसिंग यांच्या या आय पी एस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून एका मंत्र्यावर राजीनामा देण्याची पाळी आली, आणि त्यात गंभीर बाब ही की त्याच परमविरसिंग वर ३-४लोकांनी आरोप करूनही त्याला ना अजून ना अटक नात्याच्यावर गुन्हा नोंद, परमविरसिंग या पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारी वरून अनिल देशमुख या मंत्र्यावर करण्यात आलेली कारवाई, अर्णव चे व्हाट्सअप चॅट आणि ज्यामध्ये देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात अत्यंत गोपनीय माहिती बाहेर आली आहे त्यावर आणि देशमुख यांनी त्याला अटक करून कोर्टासमोर हजर केले आणि तुरुंगात टाकले . या माणसाच्या सुटकेकरिता सर्व संकेत पायदळी तुडवून सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला आणि त्याला जामीन मिळून दिला. त्यानंतर या च अर्णव गोस्वामी याने त्याचा बदला म्हणून मग हे परमविरसिंग सबंधातले सगळे नाटक घडवून आणले.

ही जि शक्ती आज देशावर राज्य
राज्य करत आहे हि कुठल्याही राजकिय पक्षाची शक्ती नाही . कारण भारतीय जनता पक्ष हा राजकिय पक्ष नसून तो एक पंथ आहे. राजकीय पक्षांचे फक्त रूप त्यांनी धारण केले आहे. या पंथाला आमची राज्य घटना मान्य नाही, लोकशाही मान्य नाही, निवडणूका मान्य नाही, समता – स्वातंत्र्य-न्याय-बंधुता -सहिष्णुता इ त्यादी मूल्य त्या पंथाला मान्य नाहीत. उलट या राजवटीचे ध्येय हे या देशात धार्मिक उन्माद वाढवा , हिंदू-मुस्लीम दंगे होत राहावेत आणि आपण राज्य करत
राहावे हे आहे. इथे हुकूमशाही आणायची आहे आणि ती हुकूमशाही अशी,जिच्या नियंत्रणाखाली समाजातील सर्व संस्था ( न्याय संस्था धरून ) कार्य करतील अशी व्यवस्था त्यांना या देशात निर्माण करावयाची आहे

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा ▪
▪महेश देवशोध (राठोड) ▪
▪वर्धा, जिल्हा प्रतिनिधी ▪
▪7378703472 ▪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *