ॲट्रॉसिटी दाखल : तारक मेहता फेम बबिताला कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक.

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 17 मे. 2021
लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यातील बबिता ही व्यक्तिरेखा साकारुन घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
कारण काय ? – काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ता हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने अनुसूचित जाती-जमाती समुदायाबद्दल जातीवाचक शब्दांचा उल्लेख करत अपमानजनक वक्तव्य केले होते. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त होऊ लागला. सोशल मीडियावर ArrestMunmunDutta हा टॅग ट्रेंड करत होता. आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर अभिनेत्रीने तिचा तो वादग्रस्त व्हिडीओ instagram वरून डिलीट केला आहे. परंतु अनेक संघटनांच्या वतीने तिच्यावर केस दाखल करून अटक करण्याची मागणी केली.
अखेर मुनमुन दत्ता वर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून देशातील अन्य राज्यांतही मुनमुन विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.