हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ गडचिरोली येथे कॅन्डल मार्च गडचिरोली, जिल्हा प्रतिनिधी प्रा. शेषराव येलेकर.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा गडचिरोली आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने इंदिरा गांधी चौक येथे कॅन्डल मार्च आयोजित केला होता. या कॅन्डल मार्च च्या माध्यमातून योगी सरकारचा निषेध करण्यात असून, आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाही करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि तिला करण्यात आलेल्या अमानुष मारहान आणि यातून नंतर तिचा झालेला मृत्यू, पोलीस यंत्रणेने तिच्या परिवारातील लोकांना विश्वासात न घेता घाईघाईने तिच्यावर केलेला अंत्यसंस्कार, आणि आता या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी हाथरस येथे गेलेल्या राष्ट्रीय नेत्यांना राज्याच्या सीमेवरच रोखण्याचा प्रयत्न आणि त्यांना धक्काबुक्की करण्याचा उत्तर प्रदेश पोलिसांचा घृणास्पद प्रकार एवढेच नव्हे राष्ट्रीय स्तरावरील स्त्री नेत्यांना हाताने पकडून त्यांना हाथरस मध्ये जाण्यासाठी पुरुष पोलिसांनी केलेला अटकाव, या साऱ्याच प्रकरणामुळे जगात भारत देशाची प्रतिमा मलीन झाली असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवनाथ कुंभारे यांचे अध्यक्षतेखाली निघालेल्या कॅन्डल मार्च प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या कुसुम आलाम, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत, गांधी विचारवंत प्रकाश अर्जुनवार, गडचिरोलीअनिस चे अध्यक्ष उद्धव डांगे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मारोती दूधवावरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, एडवोकेट सोनाली मेश्राम, इत्यादींनी आपल्या विचारातून व्यक्त करीत योगी सरकारचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, गेल्या पाच वर्षात निर्भया हत्याकांड पासून सतत स्त्री हत्याकांडाची शृंखला सुरू आहे. हे देशासाठी लाजिरवाणी बाब असून या सततच्या घटनांमुळे जगात देशाची प्रतिमा मलिन झाली आहे. पुढे असे प्रकरण घडू नयेत म्हणून देशवासीयांनी सरकारवर मोठा दबाव वाढविणे गरजेचे आहे. तसेच आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी आणि हे प्रकरण चिघळाविनाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी याप्रसंगी केंद्र सरकारला त्यांनी केली. कॅण्डल मार्च संचालन डॉ. अरुण भोसले व आभार अनिस चे महासचिव पुरुषोत्तम ठाकरे यांनी मानले. कॅन्डल मार्च मध्ये पांडुरंग घोटेकर, विलास पारखी, देवानंद गेडाम, विठ्ठलराव कोठारे, डॉ. एम ए रायपुरे, वर्षा दांडेकर, निर्मलाबाई, गणेश कोडगिरे, दादाजी चुधरी, समीक्षा कोडगिरे, अमिता मडावी, वर्षाताई पडघम, विभा मोरे, डॉ.उज्वला शेंडे , सविता मेश्राम, कल्पना लाडे, हिराचंद वेलादी, वनीशाम येरमे, अर्चनाताई जनगणना वार , आरतीताई कंगाले, गुरुदेव सेवा मंडळाचे पंडित पुडके, पुरुषोत्तम सिडाम, सुनिता चुधरी , विनायक बांदूकर, वेठे दादा, प्रशांत नैताम, धर्मानंद मेश्राम, प्रा. संतोष सुरडकर आदीसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.