BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

सोलापूर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांना जीवे मारण्याची धमकी

Summary

सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील भाजप समर्थक आ.राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी फेसबुकवरून लाईव्ह केल्याचा प्रकार समोर आल्याने याबाबत बार्शी शहर पोलिसांत मुंबईतील एकजणाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आमदार राजेंद्र राऊत यांचे स्वीय सहायक प्रशांत खराडे यांनी […]

सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील भाजप समर्थक आ.राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी फेसबुकवरून लाईव्ह केल्याचा प्रकार समोर आल्याने याबाबत बार्शी शहर पोलिसांत मुंबईतील एकजणाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आमदार राजेंद्र राऊत यांचे स्वीय सहायक प्रशांत खराडे यांनी पोलिसांत तक्रार देताच पोलिसानी नंदू ऊर्फ बाबा पाटील (रा. पनवेल, नवी मुंबई) यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याने पोलिसांनी भादंवि ५०७ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदला आहे.

या तक्रारीत शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्याविरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू न देण्याची धमकी ३ मार्च रोजी फेसबुक लाईव्ह करून त्यात मी खूप हरामी माणूस आहे.

माझ्या दाढीच्या चेहऱ्यामागे जो चेहरा आहे तो खूप कमी लोक ओळ्खतात. तुम्ही मुंबईला आल्याचे समजले तर तुम्हाला बाहेर पडू देणार नाही.

कारण खूप भाई लोकांशी संबंध आहेत. आंधळकर यांच्याविरुध्द राजकारण कराल व त्यांच्या केसाला धक्का लावला तर गाठ माझ्याशी आहे. जिवंत सोडणार नाही.

माझ्याविरोधात कितीही यंत्रणा लावली तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही असे म्हणून तलवारीने मारण्याची भाषा करून धमकी दिली असल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याचा पुढील तपास फौजदार शामराव गव्हाणे करत आहेत

सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *