सेना भवन येथे शाहिद दिनानिमित्त अभिवादन
सिल्लोड (शेख चांद प्रतिनिधी ) दि.23, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा ध्यास घेतलेल्या क्रांतिकारी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी इंग्रजांनी फाशी दिली. म्हणूनच आजचा दिवस शहीद दिन म्हणून ओळखला जातो. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, नॅशनल सूतगिरणी चे संचालक मारोती वराडे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाईं पवार, संतोष खैरनार,रवि गायकवाड, शेख शमीम, सुशिल गोसावी, फईम पठाण आदिंची उपस्थिती होती.