सुशांत सिंह प्रकरण रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक
Summary
रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याला शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुशांतच्या फ्लॅटवर पुन्हा केले घटनेचे नाट्य रूपांतर अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जबाबत तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी उशिरा सुशांतचा घरगडी दीपेश सावंतला अटक केली. सकाळी […]
रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याला शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.
सुशांतच्या फ्लॅटवर पुन्हा केले घटनेचे नाट्य रूपांतर
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जबाबत तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी उशिरा सुशांतचा घरगडी दीपेश सावंतला अटक केली. सकाळी अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली होती. रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक, सुशांतचा माजी हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाने ड्रग्ज प्रकरणात दीपेशचे नाव घेतले होते.
दरम्यान, एनसीबीने शोविक व मिरांडाला कोर्टात सादर केले. कोर्टाने दोघांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात सोपवले. अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले की, दीपेश सावंतला समोरासमोर बसवून शोविक व इतरांच्या चौकशीची गरज आहे. रियाच्या अटकेच्या प्रश्नावर एनसीबी अधिकारी म्हणाले, ड्रग्ज रॅकेटमध्ये आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू आहे. एनसीबीने कैझान इब्राहिमलाही कोर्टापुढे हजर केले. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सुशांतच्या फ्लॅटवर पुन्हा केले घटनेचे नाट्य रूपांतर
सीबीआय टीमने शनिवारी एम्सच्या डाॅक्टरांसोबत सकाळी सुशांतच्या वांद्र्यातील फ्लॅटवर जाऊन तपास केला. तेथे दीड तास फ्लॅटची व्हिडिओग्राफी करण्यात आली. वृत्तांनुसार, सीबीआय अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा क्राइम सीनचे नाट्य रूपांतर केले. सीबीआय टीमसोबत सुशांतची बहीण मीतू सिंह, कुक नीरज व केशव, फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी हेही होते. दरम्यान, मुंबई पोलिस सीबीआयला तपासात सहकार्य करत असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.