सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील रेमेडी शिवीर इंजेक्शन चोरास अटक सामान्य रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
Summary
नागपूर येथे रेमेडीशिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असताना त्याचे धागेदोरे गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयापर्यंत पोहोचले असल्याचे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आठ वर्षापासून कार्यरत असलेली आरोग्य परिचारिका पल्लवी मेश्राम(३५) हिने जिल्हा सामान्य रुग्णालयातील रेमिडीशिवीरची 12 इंजेक्शन चोरून नागपूरच्या […]
नागपूर येथे रेमेडीशिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असताना त्याचे धागेदोरे गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयापर्यंत पोहोचले असल्याचे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आठ वर्षापासून कार्यरत असलेली आरोग्य परिचारिका पल्लवी मेश्राम(३५) हिने जिल्हा सामान्य रुग्णालयातील रेमिडीशिवीरची 12 इंजेक्शन चोरून नागपूरच्या काळा बाजारात विकल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. सदर परिचारिकेला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. तिला पीसीआर करिता आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
राज्यात रेमिडीशिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. आणि याचे धागेदोरे आता गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयापर्यंत पोहोचले असल्याने सामान्य रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नुकताच नागपूर येथे बेलतरोडी पोलिसांनी रेमिडी शिवीर इंजेक्शन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीचा कसून तपास करताना त्यांना पोलीस खाक्या दाखवताच एक आरोपी अतुल भीमराव वाळके(३६) राहणार आयुर्वेदिक लेआउट नागपूर यांनी ही धक्कादायक माहिती दिली . रेमीडीसीवीर इंजेक्शनच्या काळा बाजारात सामील असणारी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे कार्यरत आरोग्य परिचारिका पल्लवी मेश्राम या वाळके यांच्या मेव्हणी आहेत. नागपूर पोलिसांनी पल्लवी मेश्राम हिला काल ताब्यात घेतले असून तिला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पल्लवी मेश्राम सोबत कोण सहभागी आहेत, ती कोणाचे नावे घेणार, हे पोलीस तपासणीत उघडकीस येईल. संपूर्ण विदर्भात कोविड रुग्णांना चांगली सेवा देणारे रूग्णालय म्हणून गडचिरोली सामान्य रुग्णालयाचा आवर्जून उल्लेख केला जातो.परंतु या घटनेमुळे मात्र गडचिरोली सामान्य रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर