साटक येथे २४ डिसेंबर ला महा रक्तदान शिबीर
नागपूर कन्हान : – ग्राम पंचायत साटक, प्राथमिक आरोग्य केंद्र, अपोलो क्लासेस व कॅरियर अकॅडेमी साटक- नगरधन व आकाशझेप फाऊंडेशन रामटेक यांच्या सयुक्त विद्यमाने साटक येथे २४ डिसेंबर ला महा रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
” देऊ मनुष्याला जिवाचे दान, चला करूया महा रक्तदान. ” गुरूवार (दि.२४) डिसेंबर २०२० ला सका ळी १० ते २ वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे सुपर स्पेशालिटी शासकिय रूग्णालय नागपुर यांच्या सहकार्याने महा रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत शिबीरातील संकलित रक्त हे सुपर स्पेलालिटी रूग्णालयातील जनसामान्य गरजु रूग्णांच्या नि:शुल्क सेवेसाठी वापरले जाणार असल्याने आपण एक संवेदनशील माणुस व सुजाण भारतीय नागरिक या नात्याने मोठया संख्येने रक्तदान करून मानवसेवेच्या राष्ट्रीय कार्यात अमुल्य योगदान द्यावे असे विनम्र आवाहन ग्रा प साटक च्या सरपंचा सौ सिमाताई उकुंडे व वैद्यकीय अधिकारी वैशाली हिंगे हयानी केले आहे. महा रक्तदान शिबीराच्या यशस्विते करिता ग्राम पंचायत साटक, प्राथमिक आरोग्य केंद्र, अपोलो क्लासेस व कॅरियर अकॅडेमी साटक- नगरधन व आकाशझेप फाऊंडेशन रामटेक चे पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535