हेडलाइन

सहकार शक्तीच्या जोरावर सहकार क्षेत्रातील प्रश्न सोडविणे हा सहकार भारतीचा प्रमुख हेतू. प्रा. शेषराव येलेकर

Summary

सहकारी संस्थांमध्ये परस्पर समन्वय व आपुलकीची भावना निर्माण करून सहकार शक्ती उदयास आणणे व तिच्या जोरावर सहकार क्षेत्रातील प्रश्न सोडवणे हा सहकार भारतीच्या स्थापने मागील प्रमुख हेतू असल्याचे सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी सांगितले. ते गडचिरोली नागरी सहकारी […]

सहकारी संस्थांमध्ये परस्पर समन्वय व आपुलकीची भावना निर्माण करून सहकार शक्ती उदयास आणणे व तिच्या जोरावर सहकार क्षेत्रातील प्रश्न सोडवणे हा सहकार भारतीच्या स्थापने मागील प्रमुख हेतू असल्याचे सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी सांगितले. ते गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सहकार भारतीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पा. खेवले, व्यवस्थापक लिंगाजी मोरांडे, शाखा व्यवस्थापक भूषण रोहनकर उपस्थित होते. शेषराव येलेकर पुढे म्हणाले कै. लक्ष्मणराव इनामदार यांनी 11 जानेवारी 1979 रोजी पुणे येथे सहकार भारतीची स्थापना केली. समाजाची आर्थिक प्रगती साधण्यासाठी सहकार चळवळ मजबूत करणे, पतसंस्था पुढील भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांना संस्कारित करून सहकार चळवळीची व्याप्ती व सक्षमता वाढविणे यासाठी सहकार भारती अविरत कार्य करीत असल्याचे ते म्हणाले.
प्रमुख अतिथी दिलीप पा. खेवले म्हणाले, सहकार भारतीचे कार्य हे जिल्हा व राज्य पतसंस्था फेडरेशन ला पूरक असून सहकार क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी तिचा मोलाचा वाटा ठरत आहे.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा संघटक भास्कर नागपुरे यांनी केले. कार्यक्रमाला विजय नवघडे, उमेश पालकर, मंगेश तिवाडे, कमलेश भोयर, उमेश मंगर, शुभम खेडेकर तसेच विविध पथसंस्थांचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *