*सरकारी बँकचे खजिकरण करण्यात येऊ नये याकरिता १५व१६मार्च ला कर्मचारी संपावर*
आमचा बँक खासगीकरणाला विरोध कशासाठी?
बँक खासगीकरण म्हणजे खेड्यातून कमीत कमी बँकिंग.
बँक खासगीकरण म्हणजे शेतीला कमीत कमी कर्ज.
बँक खासगीकरण म्हणजे बेरोजगारांना कमीत कमी कर्ज.
बँक खासगीकरण म्हणजे छोटा उद्योग, व्यापार याला कमीत कमी कर्ज
बँक खासगीकरण म्हणजे कमीत कमी शेक्षणीक कर्ज.
बँक खासगीकरण म्हणजे आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना कमीत कमी कर्ज.
बँक खासगीकरण म्हणजे जनतेच्या ठेवीची मोठी जोखीम.
बँक खासगीकरण म्हणजे जास्ती जास्त सुप्त चार्जेस.
बँक खासगीकरण म्हणजे महानगरे, शहरातून जास्ती जास्त बँकिंग.
बँक खासगीकरण म्हणजे मोठ्या कॉर्पोरेटना जास्ती जास्त कर्ज.
खासगीकरणा नंतर बदलणारा बँकिंगचा चेहरा सामान्य माणसासाठी खूप विद्रूप असेल! त्यांच्या हितसंबंधांना त्यामुळे बाधा येईल.
आता सामान्य माणसांनी विचार करायला हवा. याविरुद्ध आवाज उठवायला हवा.
आम्ही बँक कर्मचारी १५ आणि १६ मार्च रोजी संपावर जात आहोत ते आमच्या कुठल्याही मागणीसाठी न्हवे तर या देशातील सामान्य माणसाच्या हितासाठी. बँकिंग चे उज्ज्वल भविष्यासाठी. सामान्य माणसाच्या बचतीच्या सुरक्षिततेसाठी.
देविदास तुळजापूरकर
निमंत्रक
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन
महाराष्ट्र राज्य
९४२२२०९३८०
drtuljapurkar@yahoo.com