सत्ताधारी झिरो, मेकॅनिकल इंजिनीअर झाला हीरो गडचांदूर नगरपरिषदेची अजब कहानी
Summary
गडचांदुर – गडचांदूर शहरात स्थानिक नगरपरिषदे मार्फत होत असलेले ओपनस्पेस सौंदर्यीकरण, नाली बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर असून न.प. कडे सिव्हिल इंजिनिअर उपलब्ध असताना सदर कामे मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या आरोग्य विभागप्रमुख “स्वप्निल पिदूरकर” याच्याकडे दिल्याने निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचे आरोप करत […]
गडचांदुर –
गडचांदूर शहरात स्थानिक नगरपरिषदे मार्फत होत असलेले ओपनस्पेस सौंदर्यीकरण, नाली बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर असून न.प. कडे सिव्हिल इंजिनिअर उपलब्ध असताना सदर कामे मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या आरोग्य विभागप्रमुख “स्वप्निल पिदूरकर” याच्याकडे दिल्याने निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचे आरोप करत बांधकामांची जान असलेल्या न.प.च्या सिव्हिल इंजिनीअरकडेच द्यावे. हा मुद्दा विरोधी नगरसेवक रामसेवक मोरे व अरविंद डोहे यांनी कळीचा बनवला असून खालपासून तर वरपर्यंत सर्वांना लेखी तक्रार देऊनही याविषयी काहीच निष्पन्न होत नसल्याचे पाहून अखेर चार दिवसापुर्वी या विरोधी नगरसेवकांनी सुरू असलेली संपूर्ण कामे बंद केली ती कामे आजपर्यंत बंद आहे हे मात्र उल्लेखनीय. करोडोंच्या या कामांबद्दलची तक्रारी असतानाच आता येथील प्रभाग क्रमांक ५ च्या काही नागरिकांनी मेकॅनिक इंजिनीअर पिदूरकर याच्यावर कारवाईची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनातून केली आहे.
याविषयी सविस्तर असे की, येथील शेत सर्व न.३६६/१ ब हे स्व. गिरजाबाई डोहे यांचे मालकीचे शेत होते. त्यांनी सदर शेतीचे रहिवासी प्रयोजनासाठी अकृषक परवानगी घेतली. नियमानुसार त्यावेळी या ले-आऊट मध्ये ओपनस्पेस सोडण्यात आले. याला लागुन उत्तरेस ३०,३१,३२,३३ असे चार प्लाॅट आहे. यापैकी प्लॉट क्रं.३२ च्या निम्मा प्लॉट अजय लांजेकर यांनी खरेदी केला आणि मागील तीन वर्षापुर्वी त्या जागेवर घर सुद्धा बांधले. तेव्हा त्यांनी दक्षिणेस लागून ओपनस्पेसवर अंदाजे ३०० ते ४०० चौ.फूटावर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. विशेष म्हणजे सदरचे ओपनस्पेस हे अजूनही नगरपरीषदेला हस्तांतरण केले नाही. आजही तलाठी कार्यालयाच्या ७/१२ रेकॉर्डवर सरकार अशी नोंद आहे. असे असताना मात्र सत्ताधारी गप्प बसले आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे कुठलाही निधी खर्च करताना सदरची मालमत्ता ही नगरपरिषदेच्या मालकीची असणे,संबंधित व्यक्तीचे किंवा विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक असते.परंतु असे काहीही न करता नगरपरिषदेच्या मालकीचे ओपनस्पेस असल्याची खोटी माहिती देवून प्रशासकीय मंजूरी घेतली. आता त्या ओपनस्पेसवर अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण न काढता उलट त्याच्याकडून आर्थिक व्यवहार करून मागिल बाजूने त्याला ये-जा करण्यासाठी ८,१० फुटाची जागा सोडून ओपनस्पेसचे ले-आऊट दिले हे पूर्णपणे चुकीचे असल्याची तक्रार असून या मांडलीत बरीच कमाई केल्याचे आरोप करत मेकॅनिकल इंजिनीअर स्वप्नील पिदूरकर याची सखोल चौकशी करून कारवाही करावी, सदर ओपनस्पेसवरील अतिक्रमण काढावे अशी मागणी वजा विनंती कुणाल पारखी, अनिल निवलकर, केशव डोहे, संजय नरळ, जीटी आत्राम, विनोद खंळाडे, सुधीर विधाते, एसजी राजूरकर, जीबी आत्राम, सौ.आशा झाडे यांनी गडचांदूर न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे केली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी चंद्रपूर, माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रपूर, नगराध्यक्षा न.प.गडचांदूर, उपाध्यक्ष शरद जोगी, विरोधी नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे, सागर ठाकूरवार यांनाही निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली असून मुख्याधिकारी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.