हेडलाइन

संडे फाॅर सोसायटी अंतर्गत स्पंदन फाऊंडेशनचा उपक्रम.

Summary

संडे फाॅर सोसायटी अंतर्गत स्पंदन फाऊंडेशनचा उपक्रम.   गडचिरोली- समाजासाठी “एक हात मदतीचा “या उपक्रमा अंतर्गत स्पंदन फाऊंडेशनने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत नागपूर येथील श्री आयुर्वैदीकचे डाॅक्टर योगेश कुमरे यांनी किराणा साहित्य तसेच एक सौर उर्जा कंदिल दि. २६ डिसेंबर […]

संडे फाॅर सोसायटी अंतर्गत स्पंदन फाऊंडेशनचा उपक्रम.

 

गडचिरोली- समाजासाठी “एक हात मदतीचा “या उपक्रमा अंतर्गत स्पंदन फाऊंडेशनने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत नागपूर येथील श्री आयुर्वैदीकचे डाॅक्टर योगेश कुमरे यांनी किराणा साहित्य तसेच एक सौर उर्जा कंदिल दि. २६ डिसेंबर रविवारी सकाळी डाॅ. नरोटे यांच्या माध्यमातून गडचिरोली येथील वृध्दाश्रमास भेट म्हणून दिले.

त्यानंतर दुपारी धानोरा तालुक्यातील अतीदुर्गम भागात असलेल्या भापडा या गावातील थंडीच्या दिवसात अती आवश्यक असलेले ब्लँकेटचे वाटप ३२ कुटूंबाना करण्यात आले. यासाठी हिमांश देवकुले यांच्याकडून पाच हजार रूपयाची मदत स्पंदन फाऊंडेशनच्या उपक्रमास मिळाली. स्पंदन फाऊंडेशन तर्फे डाॅ.मिलिंद नरोटे, डाॅ. पंकज

सकिनलावार, डाॅ. धम्मदीप बोदेले, शिक्षकवृंद महेश मुरकूटे व महेंद्र रामटेके यांच्यातर्फे ब्लँकेटचे वितरण करण्यात आले.

हळूहळू संडे फाॅर सोसायटीच्या उपक्रमास लोकांचा सहभाग वाढत आहे. आपण सगळ्यांनी या उपक्रमास मदतीचा हात दिल्यास आपण काही प्रमाणात आपल्या गरजू बंधू व भगिनींच्या काही गरजांचे निराकरण या माध्यमातून करू शकू .

 

शेषराव येलेकर

विदर्भ चीफ ब्यूरो

पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *