संघ विचारधारा रुजविण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न :- एड. यशोमती ठाकूर.
Summary
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजप धार्जिणे राजकीय प्रचार आणि काँग्रेस विरोधी भूमिका रुजविण्याचा प्रयत्न मोदी सरकार करित असल्याचा आरोप महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या परिक्षेत ” भारत सरकार किंवा केंद्र सरकार […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजप धार्जिणे राजकीय प्रचार आणि काँग्रेस विरोधी भूमिका रुजविण्याचा प्रयत्न मोदी सरकार करित असल्याचा आरोप महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या परिक्षेत ” भारत सरकार किंवा केंद्र सरकार ” असा उल्लेख टाळून मोदी सरकार असा उल्लेख असलेला उतारा प्रश्न पत्रिकेत सामिल करण्यात आला होता. याच प्रश्न पत्रिकेत काँग्रेसने ब्रिटिश कालीन शिक्षण पद्धती निवडली असा तत्थ्यहिन आरोप असलेला उतारा जाणीवपूर्वक सामिल करण्यात आला. यात काँग्रेसची बदनामी स्पष्ट हेतू असल्याचा आरोपही एड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपले जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न करतात. मागील परिक्षेतही मनुस्मृती संदर्भात वादग्रस्त प्रश्न सोडविण्यासाठी दिले होते. मोदी सरकार जाणीवपूर्वक संघ विचारधारेची संबंधित अभ्यासक्रम रुजविण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रकारच्या दोषपूर्ण प्रश्नपत्रिका तयार करून सादरीकरणाची भूमिका करून भाजपा चा प्रचार करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम केले आहे. त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी एड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे २६ मार्च रोजी लिहीलेल्या पत्रातून केली आहे.
मुंबई
प्रतिनिधी
चक्रधर मेश्राम