*श्री गजानन महाराज प्रकटदिन कन्हान ला साजरा*
*नागपुर* कन्हान : – पांधन रोड तिवाडे ले आऊट रामनगर कन्हान येथे हनुमान, गजानन महाराज मंदीरात कोरो ना प्रतिबंधक शासनाच्या नियमाचे पालन करित छोटे खाणी कार्यक्रमाने श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला.
श्री हनुमान, श्री गजानन मंदीर पांधन रोड कन्हान व्दारे श्री गजानन महाराचां मुर्तीचे स्नान, नवीन वस्त्र घालुन पुष्पगुच्छ, माल्यार्पण करून विधीवत पुजन, भजन, आरती, दहीकाला व बुंदी प्रसाद वितरण करीत श्री गजानन महाराजांचा प्रकटदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका गुंफाताई तिडके, गंगुबाई तिवाडे, राखी महल्ले, मिराबाई वंजारी, पुष्पाबाई भोंढे, वर्षा चनेकार,आरती तकीतकर, मनोहर पाठक, प्रशांत बाजीराव मसार, माधव काठोके, भुषण निंबाळकर, राहुल महल्ले, अशोक खंडाईत, कमल यादव, किशोर नांदुरकर, राधेश्याम ठाकरे, प्रकाश वंजारी, राजकुमार सोनी, दिपक तिवाडे, शरद दुधपचारे आदी भक्तगण उपस्थित होते.
संजय निम्बालकर
उपसंपादक
पोलिस योध्दा न्यूज नेटवर्क
9158239147