BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

शिवसेना महिला आघाडीच्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढ्यातील संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन

Summary

सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयाचे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना समन्वयक शिवाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते आज सकाळी 10 वा.उद्घाटन होणार आहे. मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील डीजे कॉम्प्लेक्स येथे आजपासून शैला गोडसे यांचे सर्वसामान्य […]

सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयाचे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना समन्वयक शिवाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते आज सकाळी 10 वा.उद्घाटन होणार आहे.

मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील डीजे कॉम्प्लेक्स येथे आजपासून शैला गोडसे यांचे सर्वसामान्य जनतेसाठी संपर्क कार्यालय सुरू होणार आहे.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर विभागाचे  शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर,शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख संजनाताई घाडी, पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे,सोलापूर युवा सेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे,पंढरपूर विभाग युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख,

मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख शहरप्रमुख महिला आघाडी सर्व पदाधिकारी उपतालुका प्रमुख उपशहर प्रमुख विभागप्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष युवासेना महिलाआघाडी संघटनेचे आजी माजी पदाधिकारी सर्व शिवसैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नियमावलीनुसार सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयाचा शुभारंभ होणार असून सर्वांनी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन शैला गोडसे यांनी केले आहे

सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *