BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

शिक्षण हे व्यक्तीचा दर्जा बदलविण्याचे एकमेव साधन आहे ह्याची जाण ठेवून आपल्या लेकरांना सर्वोच्च शिक्षण द्या ॲड.डॉ.सत्यपाल कातकर

Summary

राजुरा तहसील जवळील मूर्ती गावात रमाई आंबेडकर जयंती निमित्ताने समता बौद्ध मंडळ,मूर्ती द्वारा मनोवैज्ञानिक ॲड.डॉ.सत्यपाल कातकर जाहीर नागरिक सत्कार दि.०७ फेब्रुवारी २०२४ ला करण्यात आला त्याप्रसंगी ॲड.डॉ.सत्यपाल कातकर सत्काराप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांनी कायमविणाअनुदानित व्यवसायिक कोर्सेसना […]

राजुरा तहसील जवळील मूर्ती गावात रमाई आंबेडकर जयंती निमित्ताने समता बौद्ध मंडळ,मूर्ती द्वारा मनोवैज्ञानिक
ॲड.डॉ.सत्यपाल कातकर जाहीर नागरिक सत्कार दि.०७ फेब्रुवारी २०२४ ला करण्यात आला त्याप्रसंगी
ॲड.डॉ.सत्यपाल कातकर सत्काराप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांनी कायमविणाअनुदानित व्यवसायिक कोर्सेसना अर्थात बीई/ बिटेक,एमबीबीएस,
बीएएमएस,
बीएचएमएस व्यवस्थापन,नर्सिंग, कृषी,बीफार्म,डिएड,
बीएड आदी कोर्सेसना पूर्ण देय शुल्कासहीत शिष्यवृत्ती एस्सी,एनटी,विजे ,एसबीसी व ओबीसी च्या विद्यार्थ्यांना पूर्ण देय शुल्कासहित शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यास महाराष्ट्र शासनास भाग पाडले व संपूर्ण महाराष्ट्रात २०१७ पासून प्रलंबित बाहेर राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या एनटी,विजे ,एसबीसी व ओबीसी ह्याची शिष्यवृत्ती संदर्भात सतत व प्रत्यक्ष पाठपुरावा करून वाटप करण्यास शासनास भाग पाडले ह्या सर्व कार्याची नोंद व *डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे शैक्षणिक तत्वज्ञान* यावर त्यांचे पुस्तक लिखाण व गेली तीन दशकाचेवर सामाजिक व शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष कृतीशील योगदान तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एकोनिसचेवर डिग्री घेऊन समस्त समाजाचे नावलौकिक केले ह्याची नोंद घेऊन त्यांचा जाहीर नागरिक सत्कार
दि.७ फेब्रुवारी २०२४ ला करण्यात आला.ह्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले अतिधर्मिक अंधश्रद्धा जोपासून आपसात मतभेद जोपासन्यापेक्षा जनतेनी वैज्ञानिक विचार कृतीत अंमल करून तर्क क्षमता वाढ करून मानवतावादी दृष्टीकोण अंगीकारावे व शिक्षण हे दर्जा बदलविण्याचे एकमेव साधन आहे याची जाणीव ठेवून आपल्या लेकरांना सर्वोच्च शिक्षण द्या असे अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले ह्याहीपलीकडे ते म्हणाले समाजात सलोखा निर्माण करून आपसामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करावे,तसेच महिलांनी माई रमाईचा आदर्श कृतीत जोपासावा व डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या आयुष्यात मौलिक भूमिका निभावणाऱ्या रमाई व माई ह्यांचा समान आदर करावा व सिनेमात दाखविलेल्या काल्पनिक बाबीवर लक्ष न देता डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे जिवंतपनी लिखाण झालेल्या वास्तववादी पुस्तकाचे अध्ययन करून सत्य जाणून घ्यावे तसेच जयंतीचे निमित्ताने नुकतेच रुजू झालेले विरुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री संतोषजी वाकडे ह्यांचाही सत्कार करण्यात आला. ह्याप्रसंगी समाज क्रांती आघाडी ,राजुरा तालुका अध्यक्ष ऋषीजी वाघमारे ह्यांनीही मौलिक मार्गदर्शन केले, वंचित बहुजन आघाडी,चंद्रपूर जिल्ह्याध्यक्ष श्री सोमाजी गोंडाने ह्यांनी माई रमाई ह्यांच्या आयुष्यातील घटनाचे विवेचन करून मौलिक मार्गदर्शन केले.ह्याप्रसंगी श्री मधुकर चुनारकर ,नागोराव पडवेकर माजी सरपंच मूर्ती ह्यांनीही आपले विचार व्यक्त केले,विचारमंचावर श्री बापूजी पावडे,राजुरा,
धनराज रामटेके,सरपंच,
मूर्ती,
मारोती जुलुमे ,राजुरा तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,रामकृष्ण पिपरे,माजी सरपंच,महादेवजी पिपरे,लहानुजी रामटेके,मारोती करमनकर व रवींद्र चंद्रागडे विचारमंचावर उपस्थित होते ,कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री मधुकरजी रामटेके ह्यांनी केले तर सूत्रसंचालन प्रियानी जुलमे व आभारप्रदर्शन संजय बहादेनी केले तर व कार्यक्रम यशस्वीतेकरिता मंडळाच्या समस्त उपासिका व उपासकानी अथक परिश्रम घेतलेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *