BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवांचे नियोजन करण्यात यावे सलील देशमुख कोंढाळी वाहतूक नियंत्रण कक्षासाठी अतिरिक्त वाहतूक नियंत्रकाची नियुक्तीची मागणी अनेक बस गाड्या परस्पर निघून जातात

Summary

काटोल/कोंढाळी – प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नागपूर-अमरावती महामार्गाच्या नागपूर-अमरावती या दोन्ही विभागांमध्ये ग्रामीण भागातील प्रवाशांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वर्दळीच्या कोंढाळी बसस्थानकासाठी, आदिवासी भागातील विद्यार्थ्यीनींना मानव विकास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि शालेय बस वाहतूक […]

काटोल/कोंढाळी – प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नागपूर-अमरावती
महामार्गाच्या नागपूर-अमरावती या दोन्ही विभागांमध्ये ग्रामीण भागातील प्रवाशांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वर्दळीच्या कोंढाळी बसस्थानकासाठी, आदिवासी भागातील विद्यार्थ्यीनींना मानव विकास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि शालेय बस वाहतूक सुरळीत व नियमित व वेळेवर पास पुरविणे आणि प्रवासी बस सेवेची चालकाचे कामगिरी पत्रावर(लॉगसीट वर) बस स्टेशन वर पोहोचल्या व सुटनार्या वेळी चर्चा नोंदी करीता अतिरिक्त वाहतूक नियंत्रकांची मागणी नागपुर जिल्हापरिषद सदस्य सलील देशमुख यांच्यासह स्थानिक व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
रा प म बसच्या लॉग सीटवर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालवल्या जाणाऱ्या प्रवासी बसेस, नेमलेल्या बस स्थानकांवर प्रवासी बस पोहोचल्यावर आणि प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी निघण्यासाठी (एंट्री) वेळ लिहिणे आवश्यक आहे. नागपूर विभागातील काटोल बस आगारांतर्गत येणाऱ्या कोंढाळी बस स्थानकावरून दररोज सकाळी ०५ ते रात्री ११ वाजेपर्यंत नागपूर-अमरावती प्रदेशातील व काटोल तालुक्यातील बस स्टेशन ला जोडणार्या लगतच्या ४३ गावांच्या भागातील प्रवाशी व शालेय विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांच्या वाहतुकीसाठी कोंढाळी बसस्थानकातून ४४२प्रवासी बस फेर्या (ये-जाकरतात) सोडण्यात येतात..
त्याचप्रमाणे के-टू-पीजी आणि तांत्रिक शिक्षणाचे (शाळा, इंग्रजी माध्यम, महाविद्यालय, आय टीआय, टायपिंग, शिवणकला इ. व्यावसायिक प्रशिक्षण) साठी कोंढाळी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1785 पेक्षा जास्त आहे.सध्या येथे दोन वाहतूक नियंत्रक नियुक्त आहेत.
*विद्यार्थ्यांना वेळेत पास उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त वाहतूक नियंत्रकाची गरज*
दुसरीकडे, पुढील महिन्यापासून शाळा-महाविद्यालये, तंत्रशिक्षण आणि उच्च शिक्षण सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय सवलत प्रवाशी पास, आवडेल तेथे प्रवासाकरीता पासेसचे वितरण सोबतच दररोज च्या 442 बसेसच्या लॅगसीटवर एन्ट्री दोन्ही काम एकाच वेळी करता येत नाही, त्यामुळे स्थानिक व प्रादेशिक दळणवळण नियोजन नियोजित ठेवण्यासाठी नागपूर विभाग नियंत्रक व काटोल आगार व्यवस्थापक यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोंढाळी बस वाहतूक नियंत्रण केंद्रात बसेसच्या वाहतूक एन्ट्री साठीअसलेल्या दोन वाहतूक नियंत्रकां ऐवजी व विद्यार्थ्यांना पासेस वाटप करण्यासाठी एक अतिरिक्त नियमित वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी काटोल आगाराचे आगार प्रमुख अनंत तारट यांना विचारले असता त्यांनी सांगितले की शाळा सुरू झाल्या वर अतिरिक्त वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती केल्या जाऊ शकतो.
अनेक प्रवासी बसेस बसस्थानकावर येत नाहीत
नागपूर -अमरावती मार्गावर अत्यंत गर्दी चे बसस्थानक म्हणून कोंढाळी बस स्थानक‌आहे. अमरावती वरून नागपूर कडे तसेच नागपुर वरुन अमरावती कडे जाणार्या अनेक शिवशाही व साध्या बस गाड्या कोंढाळी बस स्थानकावर न येता सरळ उडानपुवरून निघून जातात, तर कोंढाळी बस स्थानकावरील कामगिरीवर असनारे वाहतूक नियंत्रकासोबत नाहक वाद घालत. नागपूर वरून अमरावती कडे जाणार्या अनेक बस गाड्या कोंढाळी बस स्टेशन पासून 400मिटर लांब पेट्रोल पंपा जवळ उतरवून देतात. यात प्रवाशांना जीव धोक्यात घालून चौपदरी महामार्ग ओलांडून शहरात जावे लागते. या करीता रा प म अधिकार्यांनी आप आपल्या आगारातील चालक वाहकांना कोंढाळी बस स्थानकावर वाहने नेण्यासाठी लेखी स्वरूपात कळविण्यात यावे. नागपूर वरून व अमरावती वरून नागपूर कडे जाणारी एस टी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व बससेवा कोंढाळी बस स्थानकावर जाऊन प्रवास चढ उतार करावे अशी मागणी कौन्सिल फॉर ह्युमन राईटस् चे काटोल नरखेड तालुका अध्यक्ष बब्लु बिसेन यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *