महाराष्ट्र हेडलाइन

विद्यार्थ्यांच टेन्शन गेलं! ‘हा’ अभ्यासक्रम इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषेतही उपलब्ध करून दिला जाणार

Summary

मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित ठेवू नये. पुर्ण वर्षभर चालू ठेवणे आवश्यक आहे. ग्रंथालय संचालनालय आयोजित प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष आणि मराठी भाषा गौरव दिन असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत […]

मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित ठेवू नये. पुर्ण वर्षभर चालू ठेवणे आवश्यक आहे.

ग्रंथालय संचालनालय आयोजित प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष आणि मराठी भाषा गौरव दिन असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा असून आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. मराठी भाषा दिन देशभरासह जगभरात साजरा केला जातो.

प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक असून यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषेतही उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत तंत्र शिक्षण घेण्यास मदत आणि त्या विषयाची समज अधिक स्पष्ट होण्यास, मदत होईल असेही उदय सामंत यांनी सांगितले.

दिल्लीत मराठी विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या नूतन विद्यालयाच्या विकास आणि नूतनीकरणाच्या कामासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. प्रबोधन पाक्षिकाचे शताब्दी वर्ष आपण साजरे करतोय, ही निश्चितपणे आनंदाची बाब आहे.

राज्यामध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरूवात प्रबोधनकार ठाकरे यांनी केली. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे स्थान हे अनन्यसाधारण असून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हेच खऱ्याअर्थाने त्यांचे स्मरण असेल असेही उदय सामंत म्हणाले

सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *