विद्यापीठात ३०% वाढीव जागा द्या: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी
Summary
प्रज्वल राउत, क्राइम रिपोर्टर, जिल्हा भंडारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचा प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया आटोपत आल्या असून सुद्धा कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे व तसेच भंडारा,गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात उद्भवलेल्या महापुरामुळे मोठी वित्त व जीवित हानी झाली असून ह्या […]
प्रज्वल राउत, क्राइम रिपोर्टर, जिल्हा भंडारा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचा प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया आटोपत आल्या असून सुद्धा कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे व तसेच भंडारा,गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात उद्भवलेल्या महापुरामुळे मोठी वित्त व जीवित हानी झाली असून ह्या सर्व कारणांमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य झाले नाही तरीही पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रथम वर्षाच्या बी.एससी, बी.कॉम, बी.ए, बी.सिए प्रवेशात ३० टक्के जागा वाढवून देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे शहर अध्यक्ष हिमांशू मेंढे यांनी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांचा माध्यमातून कुलगुरू यांना केली आहे त्या प्रसंगी नितीन तुमाने,अविनाश हेडाऊ,मोहित रणदिवे,व इतर महाविद्यालय प्रतिनिधी उपस्थित होते.