महाराष्ट्र हेडलाइन

‘विठ्ठल’च्या मालमत्ता जप्तीचे आदेश; पोटनिवडणुकीच्या तोंडावर भालके गटाला दुसरा धक्का

Summary

ऐकीकाळी राज्यात आदर्श सहकारी साखर कारखाना अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासह जिल्ह्यातील इतर 13 साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्याच्या साखर उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे.चालू हंगामात गाळपास आलेल्या […]

ऐकीकाळी राज्यात आदर्श सहकारी साखर कारखाना अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासह जिल्ह्यातील इतर 13 साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्याच्या साखर उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे.चालू हंगामात गाळपास आलेल्या उसाचे विठ्ठल कारखान्याकडे सुमारे 39 कोटी 76 लाखांची एफआरपीची रक्कम थकीत आहे.

थकीत रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी साखर आयुक्तांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरु केली आहे. जप्ती आदेशामुळे विठ्ठल कारखान्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.या कारवाईमुळे कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांच्यावरही नामुष्की ओढावली आहे.

भालके गटाला अडचणीत आणणारा आदेश

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदावरून बॅकफूटवर आलेल्या भालके गटाला हा दुसरा धक्का समजला जातो. अगोदरच्या अडचणीत असलेल्या कारखान्याला सावरण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना मालमत्ता जप्तीचे आदेश निघणे, हे पोटनिवडणुकीच्या तोंडावर भालके गटाला अडचणीचे ठरू शकते.

यामागे विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीचे गणित तर नाही अशी चर्चा तालुक्‍यात सुरू आहे.

सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *