हेडलाइन

वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा कोंढाळी पोलिसांकडून जनजागृती

Summary

वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा कोंढाळी पोलिसांकडून जनजागृती   कोंढाळी- वार्ताहर नागपुर कोंढाळी-अमरावती राष्ट्रीय महामार्गा पैकी कोंढाळी पोलिस स्टेशन हद्दीत येणारा भाग अपघाता करीता कुख्यात आहे. होणार्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कोंढाळी चे ठाणेदार अजीत कदम यांनी आपल्या स्टाफ […]

वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा

कोंढाळी पोलिसांकडून जनजागृती

 

कोंढाळी- वार्ताहर

नागपुर कोंढाळी-अमरावती राष्ट्रीय महामार्गा पैकी कोंढाळी पोलिस स्टेशन हद्दीत येणारा भाग अपघाता करीता कुख्यात आहे. होणार्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कोंढाळी चे ठाणेदार अजीत कदम यांनी आपल्या स्टाफ सह वाहनचालक व पादचारी युवक व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी 23मे रोजी कोंढाळी येथील चौका चौकात, वर्दळीचे टी पॉईंट्सवर वाहतुकीचे नियम सुरक्षित वाहतुकीच्या मार्गदर्शक सूचना देत जनजागृती करण्यात आली. कोंढाळी चे ठाणेदार अजीत कदम व पोलिसांनी तरुणाईला साद घालत ‘नियम पाळा, अपघात टाळा ’हा उपक्रम सुरू केला आहे. समाजमाध्यमांच्या मदतीने वाहतुकीचे नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात असून तरुण वर्गाला केंद्रस्थानी ठेवले जात आहे.

भरधाव गाडी चालविणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे यांसारखे नियम मोडणाऱ्यांमध्ये तरुणवर्गाचा मोठय़ा प्रमाणावर समावेश असतो. यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये काहींना आपला जीव गमवावा लागतो तर काहींना कायमचे अपंगत्व येते. नागरिकांनी वाहतूक नियमांविषयी सजगता बाळगावी आणि नियम मोडून आपला जीव धोक्यात घालू नये या उद्देशाने ही जनजागृती करण्यात येत असुन कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दितील अपघात प्रवण दुर्घटना स्थळे व ब्लॉक स्पाट ची स्थळांवर रेडीयम पट्ट्या बसविण्यात आल्या. हेल्मेटचा वापर करणे, वेगमर्यादा, दुचाकीवरून तिघांनी प्रवास करू नये, शाळा आणि रुग्णालयांजवळ विनाकारण भोंगे वाजवू नये, वाहनांमध्ये योग्य अंतर ठेवणे यांसारख्या अनेक मूलभूत मात्र महत्त्वाच्या नियमांविषयी वाहतूक पोलिसांमार्फत समाजामध्यमें ,बॅनर,पोस्टर माहिती देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *