महाराष्ट्र हेडलाइन

*वसईत महिलेला झाडाला बांधून मारहाण, आक्षेपार्ह व्हिडीओही बनवल्याने खळबळ*

Summary

मुंबईच्या वसई परिसरात चार जणांनी एका महिलेचं अपहरण करुन तिला झाडाला बांधून बलात्कार (Mumbai Woman Kidnapped By 4 Man) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी यादरम्यान महिलेचा आपत्तिजनक अवस्थेतील व्हिडीओही तयार केला आणि तिला विवस्त्र सोडून तेथून पळ […]

मुंबईच्या वसई परिसरात चार जणांनी एका महिलेचं अपहरण करुन तिला झाडाला बांधून बलात्कार (Mumbai Woman Kidnapped By 4 Man) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी यादरम्यान महिलेचा आपत्तिजनक अवस्थेतील व्हिडीओही तयार केला आणि तिला विवस्त्र सोडून तेथून पळ ठोकला. हे आरोपी महिलेला भिवंडीच्या जंगलात घेऊन गेल्याचं महिलेने पोलिसांनी सांगितलं (Mumbai Woman Kidnapped By 4 Man).

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली, तिला विवस्त्र केलं. त्यानंतरही नराधमांचं मन भरलं नाही, त्यांनी महिलेचे केस कापले. त्याशिवाय, या घटनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. महिलेला चिंचोती नाक्याच्या जंगलात नेलं
त्यानंतर या आरोपींनी महिलेला विना कपडे तिथेच सोडलं जिथून तिचं अपहरण केलं होतं. महिलेने निजामपूर पोलिसांत या प्रकरणाची तक्रार केली आहे. आता हे प्रकरण वालिव पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

वालिव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास चौगुले (Vilas Chaugule) यांनी सांगितलं की, “महिलेच्या तक्रारीच्या आधारे आम्ही तपास सुरु केला आहे. महिलेने तक्रारीत सांगितलं की तिला आरोपींनी ऊसाचा रस पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने नकार दिला. त्यानंतर आरोपी पीडित महिलेला चिंचोती नाक्याजवळील जंगलात घेऊन गेले.”

महिलेचं अपहरण का केलं?
आरोपी महिलेला विवस्त्र अवस्थेत सोडून गेले. त्यानंतर पीडिता कशीबशी वसई येथील तिच्या घरी पोहोचली. महिलेने तीन आरोपींची ओळख केली आहे तर एकाची ओळख अद्याप झालेली नाही.

विलास चौगुले यांनी सांगितलं की, “आरोपींनी भारतीय दंड संहिता (IPC) 328 (विष देण्याचा प्रयत्न), 354 (छेडछाड) आणि 342 (जबरदस्तीने पकडून ठेवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.”

विलास चौगुले यांनी सांगितलं की, “महिलेला सध्या मानसिक आघात बसला आहे. त्यामुळे आम्ही तिला जास्त प्रश्न विचारु शकत नाही. जेव्हा ती मानसिकरित्या स्टेबल असेल तेव्हा आम्ही तिच्याकडून या घटनेची संपूर्ण माहिती घेऊ. महिलेचं अपहरण त्यांनी का केलं याचा तपास आम्ही करत आहोत. आम्हाला आशा आहे की आम्ही लवकरच आरोपींना अटक करु.”
✍️ *प्रशांत जाधव*
*नवी मुंबई न्यूज रिपोर्टर*
9819501991

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *