वराडा, वाघोली गावात सॅनिटाईझर फवारणी केली
*नागपूर* कन्हान : – तालुक्यातील वराडा ग्राम पंचायत अंतर्गत वराडा गावात कोरोना संसर्ग विषाणुचा प्रादुर्भाव वाढुन कोरोना रूग्ण संख्या वाढुन लोकांचा बळी सुध्दा जात असल्याने महिला सरपंचा व पं स सदस्या, बाजार समिती संचालक हयानी संबधित अधिका-यांशी चर्चा करून वेकोलि च्या अग्निशामन बंम्ब व्दारे वराडा व वाघोली गावात सॅनिटाईझर फवारणी करण्यात आली.
मागील तीन आठवडया पासुन वराडा गावात कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव वाढुन गावक-यासह आजी, माजी सरपंच, ग्रा प सदस्य, चपराशी कोरोना बाधित झाले. तीन लोकांचा बळी सुध्दा गेला आहे. यामुळे कोरोना विषाणु वर प्रतिबंध म्हणुन वराडा गावा चे मुख्य रस्ते बंद करून गावबंदी करण्यात आली. वराडा ग्रा प सरपंचा विद्याताई चिखले, पं स सदस्या निकीताताई भारव्दाज, पारशिवनी कृ उ बाजार समिती संचालक सिताराम(पटेल) भारव्दाज हयांनी पारशिवनी तहसिलदार वरूणकुमार सहारे, खंड विकास अधिकारी खाडे साहेब यांच्याशी चर्चा करून वराडा व वाघोली गाव सॅनिटाईझर करण्याकरिता वेकोलि कामठी उपक्षेत्र प्रबंधक तलंकर हयाना अग्निशमन बंब गाडी मागुन शनिवार (दि.२७) ला वराडा व वाघोली गावात अग्निशमन बंब गाडी व्दारे फवारणी करून दोन्ही गाव सॅनिटाईझर करण्यात आले. याप्रसंगी वराडा सरपंचा विद्याताई चिखले, ग्राम पंचायत सदस्य संजय टाले, ग्रामसेवक, दिलीपराव चिखले, साहिल गजभिये, शुभम शिंगणे सह गावकरी प्रामुख्याने उपस्थित राहुन सहकार्य केले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147