BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

लोकशाही टिकवायची असेल तर डोक्यातून आर. एस. एस आणि मनुस्मृतीचे विष उतरविले पाहिजे.

Summary

आरएसएस ने संवैधानिक व्यवस्था संपविण्यासाठी आणि मनुस्मृती प्रणित व्यवस्था लागू करण्यासाठी राज्यघटने बद्दलचा तिव्र द्वेष संख्येने मोठ्या जातींच्या तरुणांच्या मनात रुजविला,त्यांना सातत्यपुर्ण रितीने सांगितले की,एस सी.एस.टि , ओबीसी यांना आरक्षण आहे मात्र तुम्हाला नाही,मग या राज्यघटनेत तुमच्या साठी काय आहे…?? […]

आरएसएस ने संवैधानिक व्यवस्था संपविण्यासाठी आणि मनुस्मृती प्रणित व्यवस्था लागू करण्यासाठी राज्यघटने बद्दलचा तिव्र द्वेष संख्येने मोठ्या जातींच्या तरुणांच्या मनात रुजविला,त्यांना सातत्यपुर्ण रितीने सांगितले की,एस सी.एस.टि , ओबीसी यांना आरक्षण आहे मात्र तुम्हाला नाही,मग या राज्यघटनेत तुमच्या साठी काय आहे…??
ही राज्यघटना कुचकामी आहे…!!
त्याचा परिणाम असा झाला की,जाट,गुज्जर, पटेल,मराठा आरक्षणाची मागणी पुढे आली,त्यासाठी आंदोलने झाली, सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्या गेले,या जातीच्या तरुणांची माथी भडकवून त्यांना आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लावले मात्र आरक्षण मिळाले नाही हा इतिहास सगळयांनाच माहिती आहे…!!
आरक्षणासाठी,जाट,गुज्जर, पटेल आणि मराठा तरुणांनी किती जीवाचा आटापिटा केला त्यांना त्याची चांगली जाण आहे मात्र सवर्ण अर्थातच ब्राम्हणांना कुठलेही आंदोलन न करता १०%आरक्षण सहज मिळाले हा राजकीय व्यवहार जाट,गुज्जर, पटेल आणि मराठा नेतृत्व तथा तरुणांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा होता…!!
मुठभर ब्राम्हण्यवादी इतरांना झुंजवितात, आणि आपली पोळी भाजून घेतात हा अनुभव आरक्षणाच्या निमित्ताने आला…!!

आम्हालाही आरक्षण मिळेल या आशेपोटी भाजपला मतदान करुन सत्ता प्रदान करणारा वर्ग जेव्हा तीन कृषी कायदे घाईगडबडीत पास करुन शेतकरी वर्गाला गुलाम करण्याची खेळी केली तेव्हा तोच वर्ग पुन्हा हवालदिल झाला आहे आरक्षण तर मिळाले नाहीच उलट पोट भरण्याचे साधन अर्थात शेती हडप करण्याचे षडयंत्र रचले गेले हा अनुभव अतिशय वेदनादायी आहे…!!

मध्यमवर्गीय तथा नोकरदार वर्गाने हिंदुत्वाच्या भुलभुलैयाला बळी पडून भाजपला मते दिली आणि आता तोच सत्ताधारी पक्ष जेव्हा खाजगीकरण करायला निघाला तेव्हा बॅंक कर्मचारी तथा विमा कर्मचारी संपावर गेले आहेत प्रचंड अस्वस्थ आहेत…!!

देशातील मोठ्या वर्गाने हिंदुत्वाने झपाटून , विषारी प्रचाराला बळी पडून लोकशाही व्यवस्थेला तडा देणा-या आरएसएस भाजपच्या षढयंत्राचे बळी ठरलेत आणि सत्तेची सूत्रे विद्वेषी लोकांच्या हातात दिली त्याचा परिणाम असा झाला की, ज्यांनी ज्यांनी भाजपला मते दिली तेच आता प्रचंड मनःस्ताप सहन करीत आहेत…!!

उत्तरेच्या पट्ट्यातील राजस्थान,ऊत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या भागातील शेतकरी ज्यांनी भाजपला सत्ता दिली तोच शेतकरी आता भाजपला हटविले पाहिजे म्हणून पश्र्चिम बंगालमध्ये प्रचार करायला जातो आहे हे कशाचे लक्षण आहे…??
आरएसएस ने डोक्यात भिनविलेल्या विषाची मात्रा कमी होऊ लागल्याचे हे लक्षण आहे…!!

बॅंक कर्मचारी तथा विमा कर्मचारी जो रस्त्यावर उतरून आंदोलन करु लागला तो भाजपचा मतदार होता हे बोलून दाखवितो आहे आणि आता तोच भाजपला सत्तेतुन हद्दपार केले पाहिजे म्हणून बोंबलतो आहे हेही विषाची मात्रा कमी झाल्याचे लक्षण आहे…!!

दिल्लीच्या सिमेवर पत्रकाराला जाट तरुण मनमोकळे पणाने सांगतो की,आम्ही भाजपला मते देऊन चुक केली आहे हेही विषाची मात्रा कमी झाल्याचे लक्षणं आहे…!!

राकेश टिकैत सारख्या शेतकरी नेत्याने जाहिररित्या कबुली दिली आहे की मी भाजपला मतं दिलं होतं मात्र आता माझ्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे ही पश्चातापाची आग आता आरएसएसच्या विषाला जाळू शकते…!!

एकंदरीत आरएसएसच्या विषारी प्रचाराला बळी पडलेला मोठा वर्ग अनुभवाने तावून सुलाखून निघाला आहे,त्याला मनुवादी षडयंत्राचा जबरदस्त फटका बसला आहे आणि म्हणूनच आज भाजपला मते देणारा वर्ग आम्ही आता भाजपला मते देणार नाही असे ओरडून ओरडून सांगत सुटला आहे…!!
आरएसएस ने पेरलेल्या विषाची मात्रा कमी होऊ लागली आहे कारण ओबीसी वर्गांचे आरक्षण संपविण्याची अनेक उदाहरणे दररोज घडतं आहेत…!!
आरएसएस चे विष डोक्यातून उतरले तरच लोकशाही वाचेल अन्यथा मनुस्मृती चा अंमल सुरू झालेला आहे हे आता ओबीसी वर्गाने आणि हिंदुत्वाच्या भावनेने झपाटलेल्या उर्वरीत लोकांनी समजून घेतले पाहिजे…!

मुंबई
प्रतिनिधी
चक्रधर मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *