*लायन्स क्लबच्या वतीने स्थानिक महिला व बाल रूग्णालयात गरजू महिलांना सॅनिटरी पॅड चे वितरण*
स्थानिक शासकीय महिला व बाल रुग्णालयात लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने नुकतेच गरजू महिलांसाठी 2000 नग सॅनिटरी पॅड महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सोयाम यांना सुपूर्त करण्यात आले.
गडचिरोली येथील स्थानिक महिला व बाल रुग्णालयात, गडचिरोली जिल्ह्यात सह चंद्रपूर , भंडारा तसेच लगतच्या छत्तिसगड राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर गरजू महिला, स्थानिक महिला रुग्णालयात येत असतात. गरजेपेक्षा जास्त रुग्ण, या रुग्णालयात येत असल्यामुळे बऱ्याच वेळा आवश्यक सुविधा रुग्णांना पुरविताना प्रशासनाची तारांबळ उडते. अशावेळेस मदतीचा हात म्हणून लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने फुल ना फुलाची पाकळी स्वरूपात वेळोवेळी मदत केल्या जाते. नुकत्याच सॅनेटरी पॅड ची गरज लक्षात घेता लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने 2000 सॅनिटरी पॅड रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सोयाम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. संध्या येलेकर, सचिव लॉ सतीश पवार, कोषाध्यक्ष मंजुषा मोरे , सहसचिव लॉ.मनिष बोरेवार, लॉ मदत जीवानी, लॉ सुरेश लडके, लॉ शेषराव येलेकर, लॉ देवानंद कामडी , यावेळी उपस्थित होते
प्रा. शेषराव येलेकर