लाखनी तालुक्यात तीन ठिकाणी 1.25 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. नानाभाऊ पटोले यांचे प्रयत्न पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. अभिजीतजी वंजारी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
Summary
भंडारा :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 25.मे.2021.:- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. नानाभाऊ पटोले यांच्या प्रयत्नाने लाखनी तालुक्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी 1.25 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. अभिजीतजी वंजारी […]

भंडारा :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 25.मे.2021.:-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. नानाभाऊ पटोले यांच्या प्रयत्नाने लाखनी तालुक्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी 1.25 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. अभिजीतजी वंजारी यांच्या हस्ते तथा भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. मोहनजी पंचभाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
जि.प. गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखनी येथील (जिल्हा नियोजन निधि) अंतर्गत मंजूर 6 वर्गखोली (50 लक्ष रु.) बांधकामाचे भूमिपूजन पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. अभिजीतजी वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहनजी पंचभाई, उपाध्यक्ष शफीभाई लद्दानी, माजी जि. प. सदस्य आकाशजी कोरे, चंद्रकांतजी निंबार्ते, राजुभाऊ पालीवाल, लाखनी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजु निर्वाण, मनोहरजी बोरकर, सरपंचा सुनीताताई भालेराव, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष मिनाक्षीताई बोपचे, प्रियाताई खंडारे, सुभाषजी बावनकुळे, डी टी देव्हारे सर, मयूर खरवडे, नितीन भालेराव, कैलाश लुटे, भूपेश शेंडे आदी उपस्थित होते.
लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे जय राजाभोज क्षत्रिय पवार समाज संस्थेच्या अण्णा पाटील सभागृहाचे (25 लक्ष रु.) भूमिपूजन पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. अभिजितजी वंजारी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला पोवार समाज भंडाराचे अध्यक्ष चेतनजी भैरम, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहनजी पंचभाई, उपाध्यक्ष शफिभाई लद्धानी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास भगत, लाखनी तालुका काँग्रेस अध्यक्ष राजू निर्वाण, चंद्रकांत निंबार्ते, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष मीनाक्षी बोपचे, माजी जि. प. सदस्य आकाश कोरे, ज्ञानेश्वर रहांगडाले, धनपाल बोपचे पुष्पलता सोनवणे, जगदीश टेंभुर्णे, हेमचंद्र बोपचे आदी उपस्थित होते.
जि.प. विद्यालय पिंपळगांव येथील (जिल्हा नियोजन निधि)अंतर्गत मंजूर 6 वर्गखोली (50 लक्ष रु.) बांधकामाचे भूमिपूजन पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. अभिजीतजी वंजारी यांच्या हस्ते तथा भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. मोहनजी पंचभाई, उपाध्यक्ष शफीभाई लद्दानी, माजी जि. प. सदस्य आकाशजी कोरे, चंद्रकांत निंबार्ते, राजुभाऊ पालीवाल, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजुभाऊ निर्वाण, पंकजजी श्यामकुवर, मनोहरजी बोरकर, सरपंचा संगीताताई ऊईके, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष मिनाक्षीताई बोपचे, सौ धकाते मैडम, अम्बरजी येटरे, कमानेजी, नवखरेजी, मयूर खरवडे, भूपेश शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.