लहान मुलांना कोविड१९विषाणू चा धोका संभावित कोंढाळी प्रा आ केंद्र येथे आधुनिक उपकरणासह बालक कोविड सेंटर उघडण्याची मागणी
Summary
कोंढाळी-वार्ताहर येत्या काही महिण्यात नंतर कोविड १९या जागतीक महामारी ची तिसरी लाट’ -येणार असल्याचे आरोग्य विभागाचे तज्ञ मंडळींकडून सांगितले जात आहे. ही लाट लहान मुलांना धोकादायक ठरू शकते, अश्या परिस्थितीत ग्रामिण भागातील मुलांकरिता, नवजात शिशुंकरिता ग्रामिण भागातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांमधे अत्याधुनिक […]

कोंढाळी-वार्ताहर
येत्या काही महिण्यात नंतर कोविड १९या जागतीक महामारी ची तिसरी लाट’ -येणार असल्याचे आरोग्य विभागाचे तज्ञ मंडळींकडून सांगितले जात आहे. ही लाट लहान मुलांना धोकादायक ठरू शकते, अश्या परिस्थितीत ग्रामिण भागातील मुलांकरिता, नवजात शिशुंकरिता ग्रामिण भागातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांमधे अत्याधुनिक उपकरनांने सज्य असे कोविड सेंटर उभारण्यात यावे अशी मागणी कोंढाळी ग्रा प चे उपसरपंच स्वप्निल व्यास यांनी केली आहे.
आधिच राज्यातील नागरिक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वजण त्रस्त आहेत. ही लाट ओसरण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. असं असतानाच कोरोनाची तिसरी लाट देखील धडकणार आहे असं तज्ज्ञांचं मते देखील सांगितले जात आहे.
” बहुदा सप्टेंबर महिन्यात कोव्हिड-19 संसर्गाची तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. असे महाराष्ट्राच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी हा इशारा दिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्ययंत्रणेला फारच दमछाक करावी लागत आहे. त्यातच, तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याचा इशारा दिलाय.
या करिता जिल्हा प्रशान, जिल्हा परिषद प्रशासनाने कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड १९प्रतिबंधात्मक अत्यावश्यक व अत्याधुनिक उपकरणे व औषध साठा असावा अशी मागणी कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे उपसरपंच स्वप्निल व्यास संजय राऊत सह ग्रा प सदस्य्यांनी जिल्हाधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविद्र ठाकरे, जि प सी ई ओ योगश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंम्बरकर, तहसीलदार अजय चरडे नायब तहसीलदार निलेश कदम बी डी ओ संजय पाटील, व तालुका आरोग्य अधिकारी डाक्टर शशांक व्यव्हारे यांचे कडे केली आहे.
समाजामध्ये द्वारे
प्रत रवाना-
माननिय- जिल्हाधिकारी साहेब नागपूर, अतिरिक्त जिलाधिकारी साहेब, मुख्यकार्यपालन अधिकारी साहेब नागपूर, जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब जि प नागपुर, एसडीओ साहेब काटोल तहसीलदार साहेब काटोल, नायब तहसीलदारसाहेब कोंढाली , बी डी ओ साहेब, तालुका आरोग्य अधिकारी साहेब काटोल.