BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

लक्कडकोट नाक्यावर गांजासह अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त एका आरोपीला अटक

Summary

राजुरा – राजुरा तालुक्यातील महाराष्ट्र – आंध्र सीमेवरील लक्कडकोट वन उपज तपासणी नाक्यावर एका कार मधून दीड लाखाचा गांजा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी फरार झाला असून राजुरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल […]

राजुरा – राजुरा तालुक्यातील महाराष्ट्र – आंध्र सीमेवरील लक्कडकोट वन उपज तपासणी नाक्यावर एका कार मधून दीड लाखाचा गांजा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी फरार झाला असून राजुरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक 21 फेब्रुवारी ला दुपारी तीन वाजताचे दरम्यान तेलंगणा कडून मारुती कार क्रमांक एमएच 11 / एके 7318 आली. लक्कडकोट नाक्यावर थांबवून या कारची तपासणी केली असती त्यात 41 किलो 180 ग्राम ओलसर गांजा आढळला. या गांजाची किंमत 1 लाख 64 हजार 720 रुपये असून कारसह एकूण 11 लाख 74 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राजुरा पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 च्या कलम 20 व 22 नुसार गुन्हा दाखल करून आरोपी वाहन चालक दिनेश निपेन दास, राहणार साईबाबा वॉर्ड, बल्लारपूर याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. दुसरा आरोपी सुनील हा फरार झाला. राजुरा पोलिस ठाण्यात एनडीपीएस अधिनियमाच्या कलम 20 व 22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे, उपनिरीक्षक सुनील झुरमुरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गोडसे यांनी केली.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *