हेडलाइन

रॉयल्टी च्या नावाखाली चुलबंद नदी च्या पिपरी घाटातून वाळूचा अवैध उपसा जोमात.

Summary

गोंदिया जिल्हा अधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार, तब्बल ३० दिवसा करिता वाळू वाहतुकीचा परवाना, मात्र वाळू उपसा कुठून आणि किती करायचा पत्रात उलेख नाही.? गोंदिया, ता. ०८ – जिल्ह्यातील तालुका सडक अर्जुनी अंतर्गत येत अश्लेल्या ग्राम सौन्दड ते पिपरी या नदीच्या […]

गोंदिया जिल्हा अधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार, तब्बल ३० दिवसा करिता वाळू वाहतुकीचा परवाना, मात्र वाळू उपसा कुठून आणि किती करायचा पत्रात उलेख नाही.?

गोंदिया, ता. ०८ – जिल्ह्यातील तालुका सडक अर्जुनी अंतर्गत येत अश्लेल्या ग्राम सौन्दड ते पिपरी या नदीच्या पात्रातील वाळूचे अवैध रित्या उत्खनन चालू आहे, सध्या याच परिसरातील ५१७ ब्रास स्टोक चे परवाने वाहतुकी साठी मिळाले आहे, असे अशले तरी त्यांना नदी पत्रातून वाळू उपसा करण्याचा परवाना नाही फक्त साठवलेली वाळू वाहतूक करण्यासाठी हा परवाना देण्यात आला आहे.

दिनांक – २९,०९,२०२० रोजीच्या जिल्हा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या ६१७/२०२० या जावक क्रमांकाच्या पत्राच्या अनुसंघाने वाळू वाहतुकीचा परवाना मौजा पिपरी, ता. सडक/अर्जुनी, जिल्हा गोंदिया येथील [ चुलबंद नदीच्या ] गट क्र. २२७ आराजी ०.४० या जागेतून वाळू वाहतुकीचा परवाना लायसन्स आदेश्याच्या दिनाका पासून तब्बल ३० दिवसा करिता मिळाला आहे, विशेष सांगायचं म्हणजे या पत्रात किती ब्रास वाळू कुठून न्यायची आहे याचा उलेखच नाही, तर या पूर्वी या जागेतून किती ब्राश वाळू वाहतुकी साठी  सदर घाट लिलाव झाला होता या बाबद सुद्धा काहीच उल्लेख नाही.

एकंदरीत वाळू वाहतुकीचा काळा बाजार या ठिकाणी चालू आहे, क्रमांक १ ते १५ पर्यंत या पत्रात अटी व शर्ती आहेत, ज्यांच्या अधीन राहून संबंधित घाट धारकाला वाळूची वाहतूक करणे आहे, मात्र त्यांचा काहीच उपयौग होत नाही, एकंदरीत अधिकारी यांच्या संगनमताने हा काळा बाजार चालू आहे, या बाबद स्थानिक तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना विचारणा केली असता काहीच माहित नश्ल्याचे सांगितले आहे, तर गोंदिया जिल्हा माईनिग अधिकारी श्री सचिन वाढवे यांना संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, सदर लायसन्स ही, मे. अली ट्रेडर्स तर्फे प्रोप्रायटर श्री सय्यद मेहमूद अली, रामनगर,गोंदिया, यांच्या नावे आहे,  या वर स्थानिक जिल्हा अधिकारी यांनी लक्ष ध्यावे अशी मागणी होत आहे. अशी माहिती एका व्रुत्तपत्राचे संपादक प्रेम मारवाडे यांनी पोलीस योद्धाला न्यूज नेटवर्क ला दिली.

अमर वासनिक
न्यूज एडिटर
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *