BREAKING NEWS:
हेडलाइन

रेल्वेची घोषणा:12 सप्टेंबरपासून 80 नवीन स्पेशल ट्रेन होणार सुरू, यासाठी 10 सप्टेंबरपासून सुरू होणार रिजर्वेशन

Summary

 रेल्वेने 12 सप्टेंबरपासून 80 नवीन स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. यासाठी 10 सप्टेंबरपासून रिजर्वेशन सुरू होईल. रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी याविषयी माहिती दिली आहे. यादव यांनी म्हटले की, कोणत्या ट्रेनची वेटिंग लिस्ट मोठी आहे यावर […]



रेल्वेने 12 सप्टेंबरपासून 80 नवीन स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. यासाठी 10 सप्टेंबरपासून रिजर्वेशन सुरू होईल. रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी याविषयी माहिती दिली आहे.

यादव यांनी म्हटले की, कोणत्या ट्रेनची वेटिंग लिस्ट मोठी आहे यावर आम्ही सातत्याने नजर ठेवत आहोत. त्यासाठी अजून एक ट्रेन सुरू करण्यात येईल. ही क्लोन ट्रेन, अॅक्चुअल ट्रेनपेक्षा लवकर निघेल, यामुळे प्रवाशांना जागा मिळू शकेल. ज्या राज्यांमधून परीक्षा किंवा इतर कारणांसाठी ट्रेन सुरू करण्याची मागणी केली जात आहे, ती मागणीही पूर्ण करण्यत येईल.

येत्या काळात 100 अजून ट्रेन सुरू करण्याची योजना
29 ऑगस्टला अनलॉक-4 ची गाइडलाइन जारी होईपर्यंत तीन दिवसांनंतर भारतीय रेल्वेने म्हटले होते की, रेल्वे येणाऱ्या दिवसात अजून 100 ट्रेन सुरू करण्याची योजना आखत आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे 25 मार्चपासून सर्वच पॅसेंजर, मेल आणि एक्सप्रेस ट्रेन सर्व्हिस रद्द करण्यात आल्या होत्या.

सध्या देशात 230 स्पेशल ट्रेन सुरू आहेत
रेल्वे मंत्रालयाने पहिले अनेक श्रमिक स्पेशल ट्रेन सेवांसह आयआरसीटीसी स्पेशल ट्रेन सेवांची सुरुवात केली होती. कोविड-19 महामारीमुळे सध्या सर्व प्रवासी रेल्वे सेवा निलंबित करण्यात आलेल्या आहेत. सध्या देशात 230 स्पेशल ट्रेन सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *