BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

रेतीच्या ट्रॅक्टर खाली दाबून चालकाचा मृत्यू खोलमारा नदी घाटातील घटना

Summary

लाखांदूर :- लाखांदूर तालुक्यातील लिलाव करण्यात आलेला खोलमारा रेती घाट डंपिंगची रेती वाहतूक करीत असतांना ट्रॅक्टर खाली दबून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि. २९-०३-२०२४ रोजी ४ते५ वाजेदरम्यान घडली आहे. नामे, शैलेश बाबुराव बगमारे वय ३५/वर्ष रा. तई ता. लाखांदूर असे […]

लाखांदूर :- लाखांदूर तालुक्यातील लिलाव करण्यात आलेला खोलमारा रेती घाट डंपिंगची रेती वाहतूक करीत असतांना ट्रॅक्टर खाली दबून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि. २९-०३-२०२४ रोजी ४ते५ वाजेदरम्यान घडली आहे. नामे, शैलेश बाबुराव बगमारे वय ३५/वर्ष रा. तई ता. लाखांदूर असे मृतकाचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील खोलमारा रेती घाट लिलाव करण्यात आला आहे. शैलेश बाबुराव बगमारे यांचा ट्रॅक्टर डंपिंग च्या कामावर लावले होते, तसेच भरपूर प्रमाणात ट्रॅक्टर येतील कामावर आहेत
दिवसभर रेती वाहतूक केल्यानंतर सायंकाळी ४ वाजेदरम्यान डंपिंग साठी रेती भरून आणत असतांना ट्रॅक्टर वरून तोल जाऊन मागील चाकात मध्ये दबून गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्याच ट्रॅक्टरने बारव्हा आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र एकही डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे त्या ट्रॅक्टर चालकाचा उपचारविणा मृत्यू झाला. घटनेची माहिती दिघोरी पोलीस स्टेशन कळविण्यात आली काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. मृतक शैलेस ला पत्नी व दोन मुले आहेत.

डॉक्टर दीड तासाने पोहोचले
बारव्हा येथे आरोग्य केंद्र असूनही डॉक्टर विना पोरके आहे.
आरोग्य केंद्र बारव्हा येथे कधिच पुर्णवेळ आरोग्य अधिकारी देत नाही.
हे मात्र बोलके चित्र आहे. कदाचित गंभीर जखमी झालेल्या चालकांवर वेळिच उपचार केले असते तर प्राण वाचू सकले असते, सदर चालकांवर दिड तास कुठलेच औषध उपचार झाले नाही. अखेर महिला डॉक्टर कापगते यांनी येऊन चालकास मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *